किचन गॅजेट्स : फिंगर गार्ड

स्वयंपाक करताना भाज्या योग्य पद्धतीने कापणे, निवडणे सोलणे हीसुद्धा एक कला आहे. भाजी योग्य पद्धतीने कापून शिजवल्यास तिची चव अजून चांगली लागते.
Finger Guard
Finger GuardSakal
Summary

स्वयंपाक करताना भाज्या योग्य पद्धतीने कापणे, निवडणे सोलणे हीसुद्धा एक कला आहे. भाजी योग्य पद्धतीने कापून शिजवल्यास तिची चव अजून चांगली लागते.

स्वयंपाक करताना भाज्या योग्य पद्धतीने कापणे, निवडणे सोलणे हीसुद्धा एक कला आहे. भाजी योग्य पद्धतीने कापून शिजवल्यास तिची चव अजून चांगली लागते. अनेकदा भाजी बारीक कापताना भाजीबरोबर हाताची बोटे कापली जाण्याची दाट शक्यता असते. तसेच गवार, वालाच्या शेंगा यांसारख्या भाज्या निवडताना हातांच्या नखांनाही इजा पोचू शकते. म्हणूनच भाज्या कापताना हातांच्या बोटांचे संरक्षण व्हावे यासाठी, फिंगर गार्ड या प्रभावी गॅजेटचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे क्विक स्लायसिंग आणि डायसिंगसाठी फिंगर प्रोटेक्टर हे किचन टूल अतिशय फायदेशीर ठरते. या फिंगर गार्डच्या साह्याने फक्त भाज्याच नाही, तर फळांची सालेदेखील सहजपणे काढता येतात.

फिंगर गार्ड बाजारात विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. फळे सोलण्यासाठी, सुक्या मेव्यावरील आवरण काढण्यासाठी टोकदार, त्रिकोणी आकाराचे फिंगर गार्ड वापरावे आणि कांदा, बीन्स, कोबी यांसारख्या भाज्या कापण्यासाठी आयताकृती फिंगर गार्डचा वापर करावा. म्हणूनच चॉपिंग बोर्डवर भाजी चिरताना या किचन टूलचा खूप चांगला उपयोग गृहिणींना होऊ शकतो.

फिंगर गार्डची वैशिष्ट्ये

  • हे फिंगर गार्ड उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवले असल्याने गंज प्रतिरोधक आहे. वापरण्यास अतिशय सोपे आहे.

  • या फिंगर गार्डला अंदाजे २.६ इंचाचा स्लायसिंग, कटिंग प्रोटेक्टर आहे. ज्यामुळे हाताची बोटे सुरक्षित राहण्यास मदत होते.

  • फिंगर गार्ड एक स्टेनलेस स्टील शील्ड म्हणून काम करते. शील्डच्या आतील भागात असणाऱ्या वेल्डेड रिंगमुळे आपल्या हाताच्या मधल्या बोटात व्यवस्थित बसते. आणि त्याचा वापर करणे अधिक सोपे बनते.

  • फिंगर गार्ड रिंग स्वच्छ करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com