किचन गॅजेट्स : मल्टिफंक्शनल फ्राय टूल

स्वयंपाकघरात काम करत असता तळणं ही कृती अनेकदा करावी लागते. तळत असताना अनेकदा तारांबळ उडते आणि तेल हातावर, चेहऱ्यावर उडण्याची शक्यता असते.
multifunctional fry tool
multifunctional fry toolsakal
Summary

स्वयंपाकघरात काम करत असता तळणं ही कृती अनेकदा करावी लागते. तळत असताना अनेकदा तारांबळ उडते आणि तेल हातावर, चेहऱ्यावर उडण्याची शक्यता असते.

स्वयंपाकघरात काम करत असता तळणं ही कृती अनेकदा करावी लागते. तळत असताना अनेकदा तारांबळ उडते आणि तेल हातावर, चेहऱ्यावर उडण्याची शक्यता असते. विशेषतः झाऱ्यानं तळत असताना तळत असलेला पदार्थ निसटून पुन्हा तेलात पडला तर तेल उडू शकते. अशा वेळी उपयोगी पडते ते नवीन मल्टिफंक्शनल फ्राय टूल. हा एक झाराच असतो, ज्याला एक विशिष्ट चमचा किंवा क्लिप जोडलेली असते. त्यामुळे तो झारा आणि तो चमचा यांच्या बरोबर मध्ये तळलेला पदार्थ धरता येतो आणि निसटण्याची भीती कमी होते. त्यामुळे तेल अंगावर उडण्याची भीती कमी होते. तळताना आणखी एक अडचण असते ती म्हणजे त्यातलं अतिरिक्त तेल कसं निथळून काढायचं याची. त्यासाठीही हे विशिष्ट उपकरण उपयोगी पडते. झारा आणि चमचा यांच्यात तो पदार्थ धरून अगदी सहजपणे निथळताही येतो.

फ्राय टूलची वैशिष्ट्ये

  • स्टीलचाच बनल्याने दणकट. झारा आणि क्लिप यांना विशिष्ट प्रकारे जोडल्यामुळे वापरणं अगदी सहज

  • तळलेला पदार्थ निसटण्याची शक्यता कमी. पदार्थातील तेल निथळणंही सुलभ.

  • स्वच्छ करण्यास सोपा.

  • विशेषतः बॉबी किंवा बरेच छोटे पदार्थ एकाच वेळी तळत असतो, तेव्हा ते तळलेल्या तेलातूनही व्यवस्थित गोळा करता येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com