किचन गॅजेट्स : पिझ्झा मेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pizza Maker

पिझ्झा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. अनेक गृहिणी घरीच पिझ्झा बनवतात; परंतु मायक्रोवेव्ह ओव्हन प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात असेलच असे नाही.

किचन गॅजेट्स : पिझ्झा मेकर

पिझ्झा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. अनेक गृहिणी घरीच पिझ्झा बनवतात; परंतु मायक्रोवेव्ह ओव्हन प्रत्येकीच्या स्वयंपाकघरात असेलच असे नाही. त्यामुळे घरगुती कढई किंवा तव्यावर पिझ्झा बनवला जातो. या प्रक्रियेला भरपूर वेळ लागतो, शिवाय तयार होणारा पिझ्झा पूर्णपणे बेक होईलच असे नाही. गॅसची फ्लेम कमी झाली ,तर तो व्यवस्थित शिजत नाही आणि जास्त झाल्यास पिझ्झा कडक होऊन करपतो. तसेच चीज व्यवस्थित मेल्ट होत नाही, त्यावर टाकलेल्या भाज्या नीट शिजत नाहीत. याला पर्याय म्हणून बाजारात हल्ली ‘पिझ्झा मेकर’चा पर्याय उपलब्ध आहे.

पिझ्झा मेकरची वैशिष्ट्ये

  • पिझ्झा मेकरची मेटॅलिक बॉडी असल्याने दीर्घकाळ टिकते.

  • या पिझ्झा मशिनला ‘नॉनस्टिक’ चे प्लेटिंग असते. त्यावर तयार केलेला पिझ्झा बेक करायला ठेवल्यावर, टेम्परेचेर सेट करून त्याचे झाकण बंद करायचे. काही वेळातच गरमागरम पिझ्झा तयार होतो.

  • नॉन स्टिकचे कोटिंग असल्याने, त्यावर पिझ्झाव्यतिरिक्त ऑमलेट, आलू टिक्की, वॉफल्स यांसारखे नावीन्यपूर्ण पदार्थ बनवता येतात.

  • मायक्रोवेव्हसारखे प्री हिट करावे लागत नाही.

  • यात ऑटो शटऑफचे बटनही आहे. त्यामुळे, ३० मिनिटांनंतर मशीन आपोआप बंद होते. याशिवाय टेम्परेचर कमी-अधिक करण्याची सुविधाही त्यात उपलब्ध आहे.

  • अप्पर आणि लोवर हीटिंग प्लेटमुळे पिझ्झा आत ठेवल्यावर दोन्ही बाजूने पुरेशी उष्णता मिळून बेकिंग पूर्ण होते.

  • वापरण्यास, स्वच्छ करण्यास अतिशय सोपे आहे.

Web Title: Article Writes Kitchen Gadgets Pizza Maker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenarticlepizza