किचन गॅजेट्स : रोटेशनल मसाला रॅक

पारंपरिक मसाल्याच्या डब्याची जागा आता आधुनिक ३६० डिग्री रोटेशनल मसाल्याच्या रॅकने घेतली आहे.
rotating masala rack
rotating masala racksakal
Summary

पारंपरिक मसाल्याच्या डब्याची जागा आता आधुनिक ३६० डिग्री रोटेशनल मसाल्याच्या रॅकने घेतली आहे.

स्वयंपाकघरात काम करत असताना ‘मसाल्याचा डबा’ हा प्रत्येक गृहिणीच्या किचनमधला अविभाज्य घटक असतो. मॉड्युलर किचनच्या संकल्पनेनुसार, पारंपरिक मसाल्याच्या डब्याची जागा आता आधुनिक ३६० डिग्री रोटेशनल मसाल्याच्या रॅकने घेतली आहे. अनेक गृहिणींना किचनमध्ये फॅन्सी डबे वापरायला आवडतात. आपले स्वयंपाकघर अधिक आकर्षक दिसावे म्हणून गृहिणी सतत प्रयत्नशील असतात. प्लास्टिक, लाकडी, गोलाकार स्टीलचा मसाल्याचा डबा इत्यादी मसाल्याचे प्रकार परंपरेनुसार चालत आले आहेत; पण अलीकडे बाजारात आलेल्या ३६० डिग्री रोटेशनल मसाल्याच्या रॅकची चलती आहे.

अनेकदा मसाल्याचा डबा हाताळताना त्यातील मसाले एकत्र होतात, विशेषतः जिरे आणि मोहरी धक्का लागला तरी एकत्र होतात. याशिवाय मसाल्याच्या डब्याचे झाकण नीट लागले नाही, तर मसाल्याचा सुगंधही कमी होतो. या सगळ्या अडचणी या रॅकने दूर होतात.

रोटेशनल रॅकची वैशिष्ट्ये

  • एअरटाइट कंटेनरमुळे मसाल्यांचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहतो.

  • पारदर्शक प्लास्टिक कंटेनरमुळे मसाले लगेच नजरेस पडतात. फूड ग्रेड आणि बीपीए फ्री प्लास्टिकपासून बनलेला हा सेट डिशवॉशरमध्येही स्वच्छ करता येतो.

  • हा रॅक किचनच्या सौंदर्यात भर घालतो. याशिवाय किचन ट्रॉलीमधील जागाही कमी व्यापतो.

  • मसाले स्प्रिंकल करायचे असोत किंवा जास्त प्रमाणात टाकायचे असोत दोन्ही पर्याय या बरण्यांमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करता येतो.

  • यात जवळपास १२ ते १६ बरण्यांचा समावेश असतो. त्यामुळे पारंपरिक मसाल्याच्या डब्यापेक्षा जास्त प्रकारचे मसाले यात बसतात.

  • रॅकचे सर्व भाग सहजपणे वेगळे येतात, त्यामुळे स्वच्छ करण्यासही सोपा.

  • रॅक स्क्रॅच रेझिस्टन्ट, हलका आणि दीर्घकाळ टिकणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com