किचन गॅजेट्स : सिलिकॉन लीड्स

स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा विविध पदार्थ तयार झाले, की ते एखाद्या पातेल्यात, वाटीत सहजपणे काढून ठेवले जातात. काही वेळा उरलेले अन्नपदार्थ एखाद्या कंटेनरमध्ये शिफ्ट केले जातात.
Silicon Leads
Silicon LeadsSakal
Summary

स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा विविध पदार्थ तयार झाले, की ते एखाद्या पातेल्यात, वाटीत सहजपणे काढून ठेवले जातात. काही वेळा उरलेले अन्नपदार्थ एखाद्या कंटेनरमध्ये शिफ्ट केले जातात.

स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा विविध पदार्थ तयार झाले, की ते एखाद्या पातेल्यात, वाटीत सहजपणे काढून ठेवले जातात. काही वेळा उरलेले अन्नपदार्थ एखाद्या कंटेनरमध्ये शिफ्ट केले जातात. त्या वेळी पदार्थ काढून ठेवलेल्या भांड्यांवर झाकण ठेवण्यासाठी प्लेटचा आधार घेतला जातो. मात्र, त्यामुळे जास्तीची भांडी अडकून पडतात. ही कंटाळवाणी परिस्थिती टाळण्यासाठी बाजारात हल्ली स्ट्रेचेबल सिलिकॉन लीड्सच्या म्हणजेच सिलिकॉनच्या झाकणाचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. आजही अनेक गृहिणी पदार्थ झाकून ठेवण्यासाठी क्लिंग रॅप, सिल्वर फॉईल झिपर स्टोरेज बॅगचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.

क्लिंग रॅपचे प्लास्टिक एकदा वापरले, की फेकून द्यावे लागते; तसेच सिलिकॉन फॉईलदेखील एकदा वापरल्यावर फेकून द्यावे लागते. परंतु सिलिकॉन लीड्स मात्र एकदा वापरले, की स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येतात. सिलिकॉन लीडमुळे पदार्थ झाकणे सहज शक्य होते आणि त्यासाठी जागाही कमी व्यापली जाते. हे लीड्स फ्रीजर सेफही आहेत. फक्त पदार्थच, नव्हे कोल्ड्रिंक्स, सरबते, कलिंगडासारखी मोठी फळेही या लीड्सद्वारे व्यवस्थितपणे झाकून ठेवता येतात.

सिलिकॉन लीड्सची वैशिष्ट्ये

  • सिलिकॉन लीड्स गोलाकार आकाराचे असले, तरीही विविध आकाराची भांडी, वाट्या, कंटेनर यांवर बसवण्यासाठी पुरेसे ताणले जातात. चौकोनी आकाराच्या भांड्यांवरही ते अगदी सहजपणे बसतात.

  • एअर टाईट सीलसह लीक प्रूफ असल्याने पदार्थ सांडत नाही. अन्नपदार्थ ताजे ठेवण्यास मदत होते. या सिलिकॉन लीडची उष्णताप्रतिबंधक क्षमता जास्त असल्याने गरम खाद्यपदार्थ झाकणेही सहज शक्य होते.

  • सिलिकॉन लीड्स उत्तम दर्जाच्या मटेरियलपासून बनलेले असल्याने दीर्घकाळ टिकतात. मायक्रोवेव्ह सेफ, डिशवॉशर सेफ आहेत.

  • सिलिकॉन लीड्स स्ट्रेचेबल असल्याने कोणत्याही भांड्यांचा आकार सहज घेतो. तसेच ती पर्यावरणपूरकही आहेत.

  • सिलिकॉन स्ट्रेच कव्हर्स, प्लास्टिकच्या आवरणाप्रमाणे, -१००°F ते ४५०°F तापमान सहन करू शकतात.

  • गोलाकार, अंडाकृती, चौरस, गोल आणि आयताकृती कंटेनरवर फीट बसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com