किचन गॅजेट्स : सिंक डिश ड्राइंग रॅक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sink dish drying rack

अनेकदा सिंकवर भांडी घासत असताना किंवा फळं धुऊन घेत असताना ती निथळायला कुठे ठेवायची असा प्रश्न पडतो. विशेषतः भाज्या धुतल्यावर असा प्रश्न पडतो.

किचन गॅजेट्स : सिंक डिश ड्राइंग रॅक

अनेकदा सिंकवर भांडी घासत असताना किंवा फळं धुऊन घेत असताना ती निथळायला कुठे ठेवायची असा प्रश्न पडतो. विशेषतः भाज्या धुतल्यावर असा प्रश्न पडतो. त्यासाठी ‘रोल अप सिंक डिश ड्राइंग रॅक’ नावाचा एक धमाल प्रकार उपलब्ध झाला आहे. वेगवेगळ्या रॉड्सचा हा एक रोल असतो. तो पाहिजे तेव्हा सिंकवर उलगडून ठेवायचा आणि त्याच्यावर पाहिजे ती फळं, भांडी, भाज्या निथळत ठेवायच्या अशी ही उपयुक्त पद्धत. त्यामुळे फळं, भाज्या कुठं तरी अस्वच्छ जागी ठेवावे लागत नाहीत किंवा ते निथळताना पाणी ओट्यावर राहत नाही. कारण हा रोल सिंकवरच ठेवला जात असल्यामुळे पाणी त्यातच पडून जातं. हा रोल खूप जागाही खात नाही. काम झाल्यावर तो पुन्हा गुंडाळून ठेवला की झालं.

ड्राइंग रॅकची वैशिष्ट्ये

  • अगदी कमी जागा व्यापतो. पाहिजे तेव्हा उलगडून ठेवायचा आणि नको असेल तेव्हा सिंकवर गुंडाळून ठेवायचा.

  • त्याचं स्वतःचं वजन खूप कमी असलं, तरी वजन पेलू शकतो.

  • भांडी, फळं, भाज्या अशा सगळ्या गोष्टी निथळायला ठेवू शकतो.

  • भाज्या ओट्यावर निथळायला ठेवल्यामुळे त्यात जंतू घुसतात, तसं इथं होत नाही.

  • स्वच्छ करायला अतिशय सोपा.

  • काही गरम भांडी ओट्यावर ठेवली, की ओटा खराब होतो. अशा वेळी तुम्ही हा रॅक उलगडून तो ओट्यावर ठेवून त्यावर गरम भांडी ठेवू शकता. कोणतंही तापमान तो सहन करू शकतो.

Web Title: Article Writes Kitchen Gadgets Sink Dish Drying Rack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenarticle