किचन गॅजेट्स : ओव्हर द सिंक सिलिकॉन बोर्ड

स्वयंपाकघरात काम करताना किचन ओटा कितीही मोठा असला, तरीही काउंटर टॉप स्पेस कमीच पडते.
sink silicone board
sink silicone boardsakal
Summary

स्वयंपाकघरात काम करताना किचन ओटा कितीही मोठा असला, तरीही काउंटर टॉप स्पेस कमीच पडते.

स्वयंपाकघरात काम करताना किचन ओटा कितीही मोठा असला, तरीही काउंटर टॉप स्पेस कमीच पडते. किचन ओट्यालाच सिंक जोडून असल्यामुळे सिंक असलेली जागा अडकून पडते. अनेकदा पालेभाज्या, फळभाज्या किंवा फळे धुणयासाठी वेगळे भांडे वापरावे लागते, त्यानंतर पुन्हा याच भाज्या, फळे कापण्यासाठी वेगळ्या चॉपिंग बोर्डची गरज पडते. कटिंग- चॉपिंग झाल्यांनतर कचरा टाकण्यासाठी वेगळे कंटेनर वापरावे लागते. त्यामुळे गृहिणींचे एवढे कष्ट वाचावेत म्हणून अलीकडेच बाजारात ओव्हर द सिंक सिलिकॉन बोर्डचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. सिंकच्या आकाराइतकाच या बोर्डचा आकार असल्याने सिंकवर अगदी व्यवस्थितपणे फीट बसतो. ज्यामुळे भाज्या धुणे, कापणे आणि सिंकमुळे अडलेली जागासुद्धा वापरता येते.

ओव्हर द सिंक स्ट्रेनर बोर्डची वैशिष्ट्ये

  • हा बोर्ड सिलिकॉनपासून बनलेला असल्याने सिंकवर ठेवल्यास उत्तम ग्रीप मिळते. तसेच सिंकवर ठेवल्यानंतरही भाज्या कापताना बोर्ड जागचा हालत नाही.

  • या बोर्डचा आकार आयताकृती असून, याचे दोन भागांमध्ये विभाजन केले आहे. उजव्या बाजूला चॉपिंग करण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग दिलेला आहे. त्यावर अगदी सहजपणे भाज्या, फळे कापता येतात. तसेच डाव्या बाजूला छिद्रे असणारी गाळणी जोडलेली आहे. ही गाळणी सिलिकॉनची असल्याने दुमडूनही ठेवता येते आणि जागेची बचत होते. या गाळणीचा उपयोग केवळ भाज्या धुण्यासाठीच नव्हे तर भाज्या निवडल्यानंतर त्याचा कचरा त्यात टाकता येतो.

  • भाज्या, फळे स्वच्छ केल्यानंतर त्याचे पाणी थेट सिंकमध्ये पडते. याशिवाय हे उत्पादन डिशवॉशर सेफ असल्याने स्वच्छ करण्यास कोणतीही अडचण येत नाही. दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com