
अनेकदा पिझ्झा, चीज कॉर्न सँडविच, सॅलड यांमध्ये कॉर्नचा वापर प्रमुख्याने केला जातो.
किचन गॅजेट्स : स्वीट कॉर्न कटर
पावसाळ्यात थंडगार वातावरणात गरमागरम लिंबू, मीठ लावलेले मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. अनेकदा पिझ्झा, चीज कॉर्न सँडविच, सॅलड यांमध्ये कॉर्नचा वापर प्रमुख्याने केला जातो. परंतु, कणीस सोलायचे म्हटले, की कंटाळा येतो. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दाणे काढण्यासाठी हाताने किंवा चाकूने अथवा एखाद्या टोकदार वस्तूचा वापर केला जातो. अशा वेळी अनेकदा हाताला इजा होण्याची दाट शक्यता असते. या त्रासातून सुटका होण्यासाठी; तसेच गृहिणींचे काम सोपे आणि जलद व्हावे म्हणून स्वीट कॉर्न कटरचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे.
स्वीट कॉर्न कटरची वैशिष्ट्ये
कॉर्न कटर हे स्टेनलेस स्टील कॉर्न स्ट्रीपर आणि प्लास्टिक कॉर्न कटर या दोन प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध असतात. काही कटरसोबत स्टोरेज कंटेनरही असतो.
प्लास्टिक कॉर्न कटरला प्लास्टिकचे हॅंडल असते, त्यात स्टीलचे गोलाकार काटेरी चक्र असते. या हॅंडलला लागूनच ॲडजेस्टेबल स्क्रू असतो. त्यात सोललेले कणीस आत हळहळू दाबून विरुद्ध दिशेने फिरवल्यास काही सेकंदांत मक्याचे दाणे बाहेर पडतात.
याशिवाय कॉर्न स्ट्रीपर या प्रकारात पोटॅटो पिलरप्रमाणे कणीस सोलून त्याचे दाणे वेगळे करता येतात.
कॉर्न स्ट्रीपरमध्ये वापरण्यात आलेले ब्लेड हे उच्च गुणवत्तेच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असल्याने गंजप्रतिरोधक आहे.
दोन्हीही प्रकार वापरण्यास सोपे असून स्वच्छ करण्यास कोणतीही अडचण येत नाही.
Web Title: Article Writes Kitchen Gadgets Sweet Corn Cutter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..