मेकअप-बिकअप : अशी घ्यावी ओठांची काळजी | Lips Care | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lips
मेकअप-बिकअप : अशी घ्यावी ओठांची काळजी

मेकअप-बिकअप : अशी घ्यावी ओठांची काळजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • ओठांवरील काळेपणा कमी करण्यासाठी डर्मटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने योग्य औषध लावू शकता.

  • साखर आणि लिंबू ओठांवर एकत्र करून घासावे, त्यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते.

  • ओठांवर एस.पी.एफ. असलेला लीप बाम लावावा, त्यामुळे ओठांचा मुलायमपणा टिकून राहतो.

  • रात्री झोपताना ओठांवर साय लावली तर ओठ गुलाबीसर व्हायला मदत होते.

  • लिपस्टिक दीर्घकाळ टिकावी म्हणून आधी व्हॅसलिन किंवा लीप बाम लावावा.

  • लिपस्टिक चांगल्या प्रकारे अप्लाय करता यावी म्हणून आधी लीप प्रायमर किंवा लीप कंडिशनर लावावे.

  • ओठांना छान आकार देण्यासाठी लिपलायनरचा वापर करावा आणि त्यांनतर लीप ब्रशच्या साह्याने लिपस्टिक लावावी.

  • लिपस्टिक, लीप टींट हे बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा मेकअप रिमूव्हर लावूनच काढावेत.

loading image
go to top