esakal | लहान मुलांची झोप 
sakal

बोलून बातमी शोधा

Baby-sleep

जन्मापासून अगदी कुमारवयापर्यंत मुलांच्या वाढ व विकासामध्ये झोपेची महत्त्वाची भूमिका असते. त्यासाठी वयाप्रमाणे सामान्य झोपेची गरज समजून घ्यायला हवी.

लहान मुलांची झोप 

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

जन्मापासून अगदी कुमारवयापर्यंत मुलांच्या वाढ व विकासामध्ये झोपेची महत्त्वाची भूमिका असते. त्यासाठी वयाप्रमाणे सामान्य झोपेची गरज समजून घ्यायला हवी. या पूर्ण झोपेच्या तासांमध्ये अनेक कारणाने व आधुनिक जीवन शैलीच्या सवयीमुळे फरक पडत चालला आहे. वयाप्रमाणे काही गोष्टींची काळजी घ्यावी. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महत्त्वाच्या सूचना 
- मुलांची झोपण्याची रोज एक निश्चित वेळ असावी. झोपताना काही चांगल्या सवयी असाव्यात. 
- शाळा असताना व सुट्टीच्या दिवशी झोपण्याची व उठण्याची वेळ एकच असावी. (जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा फरक चालेल.) 
- झोपेच्या एक तास आधी अधिक ऊर्जेचे खेळ, म्हणजे खूप उड्या मारू द्याव्यात. टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम टाळावेत. 
- झोपताना मुलांच्या तळपायाला तिळाचे तेल किंवा थोडे गाईचे तूप त्यांच्या स्वतःच्या हातानेच लावून घेण्याची सवय लावावी. 

मुलांनी, भाऊ-बहिणीने वेगळे कधी झोपावे? 
ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल मोकाशी यांच्या मते, मुले ५ वर्षाची झाली की त्यांना वेगळे झोपण्याची सवय लावावी. जास्तीत जास्त ६ वर्षे. त्यासाठी त्यांचा झोपण्याचा कोपरा किंवा खोली त्यांना हवा तसा सजवावा. भाऊ व बहिण कोणीही ८ वर्षाचे झाले की वेगळे झोपावे. जास्तीत जास्त १० वर्षानंतर भाऊ, बहिणीने एकत्र झोपू नये. 

loading image