मेकअप-बिकअप : चेहऱ्याला असा द्या नैसर्गिक लूक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 March 2021

मेकअप हा सध्या व्यक्तिमत्त्वाचा भागच बनत चालला आहे. अगदी जवळच्या ठिकाणी किंवा जीमला जायचे झाले तरी, अनेक मुली मेकअपशिवाय बाहेर पडत नाही. अशा वेळेस हेवी मेकअप केल्यास तो चांगला दिसत नाही.

मेकअप हा सध्या व्यक्तिमत्त्वाचा भागच बनत चालला आहे. अगदी जवळच्या ठिकाणी किंवा जीमला जायचे झाले तरी, अनेक मुली मेकअपशिवाय बाहेर पडत नाही. अशा वेळेस हेवी मेकअप केल्यास तो चांगला दिसत नाही. त्यासाठी हवा असतो, नॅचरल लूक तोही मेकअपसह! अशा वेळी ‘न्यूड मेकअप’ तुमची मदत करू शकतो. 

  • आपल्या डोळ्यांना नॅचरल लूक देण्यासाठी पापण्यांना ब्लॅक मस्कारा लावा आणि पापण्या कुरळ्या करा.
  • डोळ्यांच्या आतील कोपऱ्यापर्यंत काजळ लावा. त्यामुळे डोळे सुंदर व आकर्षक दिसतील. 
  • मेकअपसाठी तुमच्या चेहऱ्याला सूट होईल अशा मेकअप शेडची निवड करा. मेकअप करताना चेहऱ्यावर नॅचरल चमक येण्यासाठी चीकबोन्स हायलाइट करा. 
  • ओठांना गडद लिपस्टिक न लावता लिपबाम किंवा लिपग्लॉसला प्राधान्य द्या. लिपस्टिक लावायची असल्यास फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावून त्यावर लिपग्लॉस लावा. 
  • ओठ आणि चेहऱ्याच्या रंगाच्या आसपासच्या शेड्स विचारात घ्याव्यात. खूप गडद शेप तुमचा न्यूड मेकअप बिघडवू शकतात. 
  • न्यूड मेकअपमध्ये आयशॅडोचा वापर करू नये. आवश्‍यकता असल्यास आयब्रोला शेप देऊ शकता; पण डोळ्यांचा मेकअप खूप जास्त गडद करू नका.
  • आवश्‍यकता असल्यास हलक्या हातांनी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावा. 
  • आयलायनर लावायचे असल्यास, डोळ्यांच्या बाहेरील बाजूने त्याची एक रेष हलकीशी बाहेरच्या बाजूने ओढावी. यामुळे तुमचे डोळे मोठे व सुंदर वाटतील. आयलायनर लावताना ते जास्त जाड लावू नये.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Face Makeup natural Look

Tags
टॉपिकस
Topic Tags: