माय फॅशन : व्यक्तिमत्त्वानुसार फॅशन हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garima Parihar

मला अंधपणाने फॅशन ट्रेंड्स फॉलो करणे जमत नाही, कुठलीही स्टाइल फॉलो करण्यापेक्षा मी स्वतःवर जे छान वाटतील, असे कपडे घालते.

माय फॅशन : व्यक्तिमत्त्वानुसार फॅशन हवी

- गरिमा परिहार

मला अंधपणाने फॅशन ट्रेंड्स फॉलो करणे जमत नाही, कुठलीही स्टाइल फॉलो करण्यापेक्षा मी स्वतःवर जे छान वाटतील, असे कपडे घालते. मला वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही प्रकारचे कपडे परिधान करायला आवडतात. सोनी सब वाहिनीवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ या मालिकेत दीप्ती या माझ्या व्यक्तिरेखेची स्टाईल स्टेटमेंटजी आहे, तशी काहीशी मी खऱ्या आयुष्यात देखील आहे. दीप्ती ही वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल, प्रसंगांना अनुसरून कपडे परिधान करते. तिचं ऑफिसवेयरही खूप क्लासी आहे. मीदेखील माझ्या व्यक्तिरेखेप्रमाणेच खऱ्या आयुष्यात फॅशन करते. मी कुठलीही फॅशन फॉलो करताना माझ्या कम्फर्टला जास्त प्राधान्य देते. फॅशन ट्रेंड फॉलो करण्यासाठी अवघडून राहणं मला पटत नाही.

पारंपरिक पोशाख परिधान करताना, विशेषत: साडी नेसताना अनेक गोष्‍टींची काळजी घ्यावी लागते. साडी नेसताना मी एका गोष्टीची काळजी घेते ते म्हणजे आपण कुठल्या प्रसंगासाठी जातोय. लग्न समारंभासारखा मोठा प्रसंग असेल, तर आपण साडीसोबत खूप दागिने घालू शकतो; पण छोट्या समारंभासाठी जात असू, तर मी ओव्हरड्रेस्ड नाही वाटणार याची काळजी घेते. साडीसोबत व्यवस्थित दागिने आणि छान मेकअप असेल, तर आपला लूक जास्त खुलून येतो.

माझा फॅशन फंडा आहे कम्फर्ट ओव्हर फॅशन. तुम्ही कम्फर्टेबल कपडे घातले, तर तुम्ही अजून कॉन्फिडन्ट आणि सुंदर दिसता. मला सगळे रंग आवडतात. ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्ती ही सगळ्या रंगांचे कपडे घालते आणि तशीच खऱ्या आयुष्यात मीदेखील सगळ्या रंगांसोबत एक्स्पिरिमेंट करते. माझ्या मते तरी भारतीय मुलींच्या स्किनटोनला सगळे रंग खुलून दिसतात, त्यामुळे आपण जितके रंगांशी खेळू तेवढे आपण फॅशनच्या जवळ आहोत असं मला वाटतं.

मला आलिया भट हिचा फॅशन सेन्स खूप आवडतो. ती खूप ग्रेसफुली सगळ्या प्रकारचे आऊटफिट कॅरी करते आणि ती तिच्या फॅशन सेन्सनं तरुण आणि आत्मविश्वासपूर्ण मुलींचं प्रतिनिधित्व करते, असं मला वाटतं.

फॅशन टिप्‍स

१) तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरून कपडे परिधान करा आणि तुमची खरी ओळख जपून ठेवा. फॅशनसाठी जे तुम्ही नाहीत, ते बनू नका.

२) आत्मविश्वास ठेवा. कारण तुम्हाला आत्मविश्वास असेल तर तुम्ही आपोआप सुंदर दिसता.

३) आपण कुठल्या प्रसंगासाठी जातोय, बाहेर तापमान काय आहे, दिवस आहे की रात्र, या सगळ्या गोष्टींचा विचार करून कपडे परिधान करा.

४) कम्फर्टेबल कपडे परिधान करा. तुम्ही कम्फर्टेबल असाल, तर तुम्हाला वावरणं सोपं जातं.

५) अॅक्सेसरीज घालताना लक्ष द्या, की तुम्ही ओव्हरड्रेस्ड तर नाही होत आहात. हेच खऱ्या फॅशनचे सौंदर्य आहे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)