घरात आनंदी वातावरण तयार करणं ही गोष्ट आपल्याच हातात असते. घरातला एखादा कोपरा छान पद्धतीनं सजवला, की संपूर्ण घरात प्रसन्नतेचा शिडकावा होऊ शकतो. ही सजावट कायमस्वरूपीच असायला पाहिजे असं काही नाही.
अधूनमधून काही तरी कल्पकताही लढवता येऊ शकते. बारामतीच्या उज्ज्वला पवार यांनी अशाच प्रकारे एक कोपरा ‘कला कोपरा’ केला आहे. त्यासाठी त्यांनी मध्यभागी एक लंबगोलाकार पाइप ठेवून त्याच्याभोवती फुलांची रांगोळी केली आहे. या रांगोळीत विविध रंगांचा वापर केल्यामुळे लूक बदलून जातो. फुलांबरोबर पानांचाही वापर करण्यात आला आहे आणि मधोमध दिवाही ठेवल्याने तो कोपरा आणखी उठावदार झाला आहे.
घराचा कोपरा सजविण्याबाबत तुमच्याही कल्पना आणि फोटो आम्हाला पाठवा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.