माय फॅशन : ‘आत्मविश्वास हवाच’

मला सगळ्याच प्रकारचे कपडे आवडतात. साडी नेसायला खूप आवडते. वेस्टर्न वेअर आणि कॅज्युएल ड्रेसेस खूप आवडतात.
Pooja Katurde
Pooja KaturdeSakal
Summary

मला सगळ्याच प्रकारचे कपडे आवडतात. साडी नेसायला खूप आवडते. वेस्टर्न वेअर आणि कॅज्युएल ड्रेसेस खूप आवडतात.

- पूजा कातुर्डे

मला सगळ्याच प्रकारचे कपडे आवडतात. साडी नेसायला खूप आवडते. वेस्टर्न वेअर आणि कॅज्युएल ड्रेसेस खूप आवडतात. वेगवेगळ्या पद्धती, कपडे व फॅशन ट्राय करायला मला खूप आवडते. माझ्या डोक्यात काही आयडिया असली, की मी त्यानुसार फॅशन डिझायनरकडून कपडे शिवून घेते. मला नव्वदीतली फॅशन खूप आवडते.  फॅशन करताना तुम्हाला जो ड्रेस घालायचा असेल किंवा साडी नेसायची असेल, तर तुम्ही त्यात कम्फर्टेबल राहा. तसेच ते कॅरी करणे गरजेचे आहे. असे केल्यास तुम्ही सुंदर तर दिसणारच, त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढेल. आमविश्वास असेल, तर आपण जे कपडे परिधान करू ते नक्कीच उठून दिसतात आणि कोणतेही रंग आपल्यावर चांगले दिसतात.

मला स्वतः ला साडी नेसताना चापूनचोपून म्हणजे अगदी व्यवस्थित नेसावी लागते. घड्या व पदर व्यवस्थित आला पाहिजे. आपल्याला जी आवडेल ती फॅशन आपण केलीच पाहिजे. आपण जे कपडे घालू किंवा जे ट्राय करू, तो आपला फॅशनफंडा झाला पाहिजे. कुणीतरी आज हे घातले आहे किंवा कुणीतरी एखादा ट्रेंड सेट केला आहे, तर आपणही हेच घातले पाहिजे किंवा तेच खरेदी केले पाहिजे, असे करायला नको. तुम्ही जे कपडे घालाल, तोच फॅशनफंडा झाला पाहिजे. मला वेगवेगळे कपडे ट्राय करायला तर आवडतातच; पण जुन्या काळातील म्हणजे चित्रपट व गाण्यांमधील कपडे घालायला आवडतात. जसे बेल बॉटम पॅन्ट, वेगळ्या पद्धतीची साडी नेसणे, बलून टॉप्स, बलून साडी फॅशन म्हणून खूप आवडते. ती फॅशन खूपच कमाल होती. तो ट्रेंड मला आताही खूप आवडतो.

रंगाची निवड आपण केली नाही पाहिजे. कारण, ज्या रंगाचे कपडे पसंत करू तो भारीच दिसला पाहिजे. आपण सगळ्याच रंगाचे कपडे घालायला पाहिजेत. हा रंग आपल्याला सूट नाही होणार, असे म्हणून जमत नाही. कारण, तो सूट करून घ्यावा लागतो अन् तो सूट होतो. कारण, ट्राय केल्याशिवाय ते शक्य होत नाही. माझ्या बाबतीतही तसे होत होते. मला न्यूऑन कलर किंवा मस्टर्ड यलो कलर शोभणार नाही, अशी भीती वाटत होती; पण दोन्ही रंगाचे कपडे छान दिसतात. मी फॅशनच्या बाबतीत खूप लोकांना फॉलो करते.

मला फॅशन सेन्सच्या बाबतीत प्रिन्सेस डायना खूप आवडते. तिच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि तिचे खूप फोटोही पाहिले आहेत. आलिया भट्टही खूप आवडते. ती कॅज्युएल वेअर सुंदररित्या कॅरी करते. सोनम कपूर, सई ताम्हनकर हिची फॅशनही आवडते; पण मीच माझी फॅशन आयकॉन आहे. कारण, मीच माझी फॅशन डेव्हलप केली आहे. त्यामुळेच मला अनेकजण कपडे खरेदी करण्यासाठी घेऊन जातात. प्रत्येकाला मॉलमध्ये जाऊन ब्रॅण्डेड कपडे घेणे शक्य होत नाही; पण स्ट्रीट शॉपिंगही चांगली असते. फक्त हा ड्रेस आपल्याला खूप छान दिसेल, एवढा आत्मविश्वास ठेवा अन तोच आपला ब्रॅण्ड बनवून असे कपडे बिनधास्त घाला.

फॅशन टिप्स

  • तुम्ही तुमची तुलना कुणाशीही करू नका.

  • माझी शरीरयष्टी अशी आहे, त्यामुळे मला हा रंग छान दिसणार नाही, हे कपडे सूट होणार नाही, माझी उंची एवढीच आहे, हे स्वतःबद्दल मनात निर्माण होणारे प्रश्न डोक्यातून काढून टाका.

  • आत्मविश्वासू राहा आणि स्वतःला छान कॅरी करा.

  • चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. त्यातून तुम्ही सर्वांत उठून दिसता अन् तुमच्यात आत्मविश्वासही आपोआप येतो.

  • नवीन स्टाइल आपण फॉलो करतोच; पण तुम्हाला वेगळा फिल हवा असेल, तर नव्वदीतली स्टाइलही फॉलो करा. ती तुम्हाला नक्कीच छान दिसेल.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com