esakal | Women`s Day: देशात महिला सुरक्षेचा निव्वळ फुगा; तुम्हीच विचार करा!
sakal

बोलून बातमी शोधा

rutuja kadam writes blog about womens day

घरापासून ऑफिसपर्यंत आणि समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ‘ती’ सतत संघर्ष करत होती आणि करत आहे. ‘ती’चा हा लढा केवळ महिला दिनापुरता मर्यादित राहणारा नसून, ती समाजाकरीता जणू मशालाच आहे.

Women`s Day: देशात महिला सुरक्षेचा निव्वळ फुगा; तुम्हीच विचार करा!

sakal_logo
By
ऋतुजा कदम

जागतिक महिला दिनाची 2020 या वर्षीची थीम #EachforEqualअशी आहे. यावर प्रकाश टाकताना वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेणे गरजेचे आहे. बॅलेन्स फॉर बेटर ही थीम लिंग समानता या विषयावर भर देते. समानता अर्थाच फक्त समाजात आणि लिंगसाठी मर्यादित नाही तर, सांस्कृतिक,घरघुती, वैयक्तिक आणि अशा अनेक पातळीवर मिळणे अपेक्षित आहे. महिलांसाठी समानता मिळावी याची आजही अपेक्षा करावी लागत आहे यापेक्षा दुर्देव काय असू शकते?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठोस पावले आहेत कुठं?
आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आजच्या आधुनिकतेच्या घडीला जिथे आपण डिजिटल युगाच्या गोष्टी करतो तिथेच आजही लिंग समानतेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येतेय. जागतिक पातळीवर हा संघर्ष सतत सुरु आहे. महिलेच्या सुरक्षेविषयी हेरवी पद्धतशीरपणे बोलणे टाळणारे, वर्षभर त्यावर कोणत्याही प्रकारची ठोस पावले न उचलणारे ‘महिला दिना’ च्या शुभेच्छा सोशल मीडियावरुन देतील. हेच दुहेरी चित्र समाजासाठी घातक ठरले आहे. महिलांसाठी सदैव कार्य़रत असल्याचा, देशामध्ये महिलांसाठी सर्व सुरळीत सुरु असल्याचा फुगा तुमच्या-आमच्या समोर ठेवण्यात आला आहे. हा फुगा केवळ हवेचा आणि बनावट आहे.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आजच सुत्रं महिलांकडे
ऑफिसमध्ये महिला दिनानिमित्त काही ऑफिसमध्ये त्यादिवशीची सर्व सुत्रे तेथील महिलांकडे सोपवण्याचा उपक्रम आहे. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. पण, मग हे एका दिवसापूरते मर्यादित का ? एखादी स्त्री जबाबदारी सांभाळण्यासाठी सक्षम नाही हे ठरवण्याचा अधिकार पुरुषवर्गाला कोणी दिला ? मुलीला फक्त शिकवून प्रगती होणार नाही तर, प्रत्येक गोष्टीमध्ये तिला समान वाटा हा मिळाला पाहिजे. समान हक्काची तिला मिळवून देण्यासाठी ती आपल्यासारखीच, आपल्या एवढीच सक्षम आहे हे पुरुष वर्गाच्या मनावर कोरलं गेलं पाहिजे.कामाच्या ठिकाणी मुलगी म्हणून तिला आधीच संधीची उपलब्धी कमी आहे. काही क्षेत्रांमध्ये तर तिला शिरकाव करणेही कठीण आहे. अशामध्ये ती स्वबळावर खंबीरपणे उभी राहताना, स्वत: कमवू पाहत आहे. पुरुषांच्या तुलनेत मात्र तिचे वेतन निम्म्यापेक्षा कमीच असल्याचे काही तज्ञ मंडळी सांगतात.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वेब सिरिज काय सांगते?
समान हक्कांविषयी बोलताना मात्र तिला प्रत्येक स्थरावर हिणवलं जाते याकडे सोयिस्कररित्या सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. वर्कप्लेसमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची नोंद ही कागदावर नाही. ती अदृश्य आहे कारण, वर्कप्लेसमध्ये तिच्यावर होणारा अत्याचार हा फक्त शारिरीक नाही तर, शाब्दिक आणि मानसिक त्रास देणाराही आहे. काही दिवसांपूर्वी Dice Media या कंपनीची ‘अडल्टडींग’ ही वेब सिरिज यूट्यूबवर रिलिज झाली. त्याच्या दुसऱ्या सिझनमध्ये कामाच्या ठिकाणी मुलीवर होणाऱ्या बळजबरीवर अतिशय गांर्भीर्याने भाष्य केले आहे. चार- चौघात हिणावून बोलणे, बॉडीशेमिंग, कपड्यांवरुन टीका, अस्वस्थ करणारी टीका हे साधं वाटत असलं तरी मात्र ते चुकीचेच आहे.कपड्यांवरुन तिच्याविषयी जजमेंट तयार करणे आणि तिच्यामधील कलागुणांना डावरुन लावणे हेच चित्र अनेक ऑफिसमध्ये पाहायला मिळते.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

निसर्गाने तयार केलेल्या मानवामध्ये लिंगाचे प्रकार आहेत.मुळात प्रश्न हा आहे की मग पुरुषवर्गाने पहिल्या आणि उत्तम स्थानावर राहिले पाहिजे असा अट्टहास कशासाठी ? कामाच्या कागपत्रांवर, कॉलेजच्या ऍडमिशन फॉर्मवर, इंटरनेटवरील पर्यांयामध्येही फिमेलचा ऑप्शन दुसऱ्या स्थानावर का आहे याचे उत्तर सापडत नाही. स्त्रींयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हाच दुय्यम आहे. लिंग समानतेच्याही पलीकडे आपल्यावर होण्याच्या अत्याचाराविरुद्ध #मिटू या सोशल मीडिया चळवळीमधून आवाज उठवला गेला. अमेरिकेत चालू झालेल्या या चळवळीचं वादळ भारतातही वेगानं पसरताना दिसलं. अनेक टीका, आरोप-प्रत्यारोप आणि तरही मोठ्या धेर्याने स्त्रियांनीअत्याचाराविरुद्ध पाऊल उचलले. पण इथेही पुरुषी अहंकाराला आणि प्रतिमेला जबरदस्त धक्का लागल्याने काही आरोपी पुरुष मंडळींनी पीडित स्त्रियांचं जगणं अजूनच बिकट केलं.आरोप केलेल्या काही महिलांना पुढे काम न मिळण्याच्या किंवा धमकी देण्याच्या घटनाही समोर आल्या.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सतत नाजूक चष्म्यातून पाहू नका
कोण्याही एका महिलेला होणारा त्रास फक्त शारिरीक नसतो अनेकदा तो मानसिकही आहे. स्त्रीला सतत कमकुवत, नाजूक, अपात्र या चष्म्यातून पाहिल्याने आपोआप वागणूकही तशीच दिली जाते.‘प्रत्येक दिवस हा महिला दिन आहे’ असे म्हणटले जाते पण, प्रत्यक्षात असे काही दिसत नाही.सोशल मीडियावरील शुभेच्छा, ऑफिसमध्ये एकदिवशीय सेलिब्रेशन इथवरचं हे येऊन थांबते. हा एक दिवस सोडल्यास वर्षभर स्त्रीयांना मिळणारी वागणूक त्यावर विचार करणे आणि क्रिया करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर फक्त दया न दाखवता मदतीचा हात पुढे करुन समाजात वर्चस्व असणाऱ्या पुरुषांनी साथ देण्याची गरज आहे. राजकारणी म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनीधी हे लोकांसाठी काम करणारे आणित्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी. जाहीर सभेत भाषणं करताना अशा अनेक नेत्यांची जीभ घसरताना दिसते. भर सभेत महिलांविषयी बोलले जाणारे अपशब्द, टीका किंवा त्यांना दिले जाणारे फालतू सल्ले याची अनेक उदाहरणे आहेत.यामधून फक्त महिलांचा अपमानच होत नाही पण, सबंध महिला वर्गाविषयीची पुरुषांची काय मानसिकता आहे हे समोर येते. लोकांचे प्रतिनिधित्व करणारी ही मंडळी भर सभेत कशाप्रकारचे धडे देतात हे समजते.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चर्चा व्यर्थच
प्रत्येक महिलेला रोजच्या जीवनात असे काही वाईट अनुभव येतच असतील. जिथे तिला पुरुषांच्या तुलनेत कमी लेखलं जात आहे किंबहुना ‘बाई नाजूक असते’ त्यामुळे ती पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकत नाही अशी शिकवण दिली जाते. लिंग समानतेचा थेट संबंध कुठे ना कुठे तरी रोजच्या घडामोडींशी, घरामध्ये दिली जाणारी शिकवण, आणि दृष्टिकोनाशी आहे. गोष्टी लहान वाटत असल्या तरी याच मानसिकतेचं रूपांतर नंतर विरोधामध्ये होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच की मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत लिंग समानतेच्या चर्चा व्यर्थच आहेत. नैसर्गिकरीत्या प्राप्त झालेल्या लिंगामध्ये भेद करण्याचा किंवा तिला कमी दर्जा देण्याचा अधिकार कोणालाच नाही. मुळात स्त्री आणि पुरुष हे जरी वेगळे लिंग असले तरी,त्याआधी ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे जोपर्यंत समाजाला उमगत नाही तोपर्यंत हा तिढा सुटणार नाही.
समाजाने स्त्रीकडे फक्त आणि फक्त एक व्यक्ती म्हणूनच बघावे. याची सुरुवात घरापासून होणे गरजेचे आहे. समाजाने महिलांच्या बाबतीत तयार केलेले हे “taboo” तोडण्याकरिता स्त्रियांनी सक्षम व्हावे. स्त्रियांनीच दुसऱ्या स्त्रियेचा आधार होऊन समाजाने तयार केलेल्या चौकटींना तोडाव. स्त्री पुरुष समानतेच्या या प्रयत्नात कुठे ना कुठे तरी हा समाज स्त्रियांनाच पुरुष होण्यास भाग पाडत आहे का? अशी शंका मनात येते. शिक्षण, जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास ही शस्त्रे समाजात टिकून रहाण्याकरिता तुम्हाला मदत करू शकतील.उर्वरित पुरुष वर्गाकडून एवढीच अपेक्षा आहे, स्त्रीला ‘स्वतंत्र व्यक्ती’ म्हणूनच जगवा आणि जगू द्या कारण ही फक्त गरज नसून तो तिचा अधिकार आहे! महिलादिना निमित्त प्रत्येक मुलीला आणि समाजाला प्रेरणा देणारा कोट-
” Why are girls always told that they have to be delicate, fragile, princess It’s wrong. Be a warrior, a superpower and a fighter!
(Quote source- Internet) 

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

International Womens Day

loading image