Women`s Day:देशातच नव्हे, जगभरात महिलांच्या अडचणी सारख्याच; काय आहेत आव्हाने?

ऋतुजा कदम
Friday, 6 March 2020

ज्या मुली शिक्षित आहेत त्यांनाही पुढे जाऊन लग्नाच्या बेडीत अडकवले जाते. साहजिकच लग्न झाल्यावर तिचे संपूर्ण आयुष्य हे मुलींना वाढवण्यातच जाते.

महिलांविषयी फक्त देश पातळीवर नाही तर, जगभरातून अनेक चळवळी समोर आल्या आहेत. इतिहासाची पाने पलटताना लक्षात येते महिलांना त्यांच्या हक्कांसाठी एवढचं काय तर, समानतेसाठीही प्रचंड रोष पत्करावा लागला आहे. 21 व्या शतकात आपण चंद्र, मंगळावर पोहोचलो असलो तरी जगभरातील मुलींना आणि महिलांना काही अडचणींचा सामना हा करावाच लागतो आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. जाणून घ्या तुमच्या आजुबाजुच्या आणि इतर जगभरातील प्रत्येक महिलेला कोणत्या अडचणींचा आजही सामना करावा लागतो आहे. 

महिलांशी संबंधित आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1. शिक्षणाची संधी
शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. जगभरात शिक्षण घेण्याचा मुलभूत हक्क बहाल केला आहे. 2013 च्या UNESCO ने समोर आणलेल्या रिपोर्टनुसार, प्राथमिक शिक्षण घेऊ शकणाऱ्या वयाच्या जवळपास 31 दशलक्ष मुली या शाळेत जाऊ शकत नाहीत. विकसनशील देशांमध्ये चार पैकी एक मुलीने प्राथमिक शिक्षणही घेत नाही. ज्या मुली शिक्षित आहेत त्यांनाही पुढे जाऊन लग्नाच्या बेडीत अडकवले जाते. साहजिकच लग्न झाल्यावर तिचे संपूर्ण आयुष्य हे मुलींना वाढवण्यात अर्थात चुल व मुल पाहण्यात जाते. 

Image result for women education issues

2. नोकरीची संधी 
विकसनशील देशांमध्ये महिलांना नोकरीच्या संधी कमी आहेतच. त्याशिवाय अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्येही महिलांना नोकरीच्या समान संधी उपलब्ध नाहीत. हे दुर्देवच म्हणावं लागेल की, आजही अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना समान संधी उपलब्ध नाहीत. जागतिक पातळीवर महिला पुरुषांच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी प्रमाणात कमाई करतात. यासाठी महिलांचे सशक्तिकरण प्रत्येक पातळीवर गरजेचे आहे. शिवाय महिला जी कमाई करतात त्यावर संपूर्णपणे तिच्या परिवाराचा किंवा नवऱ्याचा अधिकार असतो. 

Image result for women at workplace

3. आरोग्य आणि अधिकार 
महिलांविषयीचे आरोग्याच्या समस्या या भयानक आहेत. मात्र त्यावर आजही कोणते कठोर पाऊल उचलले जात नाहीए. जगभरातील विकसनशील देशांमधील जवळपास 225 दशलक्ष महिलांना फॅमिली प्लानिंग अर्थात कुटुंब नियोजनाविषयी माहिती नाही. हा विषय त्यांच्यासाठी गरजेचा नसल्याचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत. कुटुंब नियोजन हा महिलांच्या आरोग्याशी थेट जोडणारा मुद्दा आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या वुमन डिलिव्हरया ग्रुपच्या रिपोर्टनुसार, 74 दशलक्ष महिलांची अनियोजित गर्भधारणा, 36 दशलक्ष महिलांचे गर्भपात होतात. हे आकडे महिलांच्या आरोग्याचा विचार करता भयानक आहेत. यामध्ये गर्भपात होताना महिलांचे मृत्यूचे प्रमाणही तिचकेच जास्त आहे. 

महिलांशी संबंधित आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

4. आईचं आरोग्य 
एकुणच महिलांच्या आरोग्याविषयी सांगताना अटळ असा भाग आहे तो म्हणजे गर्भधारणा. World health Organization च्या रिपोर्टनुसार, जवळपास 800 महिलांचा रोज गर्भधारणेच्यावेळी मृत्यू होतो. अर्थाच गर्भधारणेसंबंधित कारणांमुळे त्यांचा होणारा मृत्यू हा प्रतिबंधात्मक म्हणजेच काळजी घेतल्यास टाळण्याजोगा होता. एका वर्षात 3 लाख महिलांचा दुसऱ्या जीवाला जन्म देताना मृत्यू होतो आहे. या आकड्यांवरुन या समस्येची गंभीरता लक्षात येऊ शकते. 

महिलांशी संबंधित आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

5. लैंगिक छळ, हिंसा
बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. फक्त सामान्य महिला याला बळी पडत नाहीत तर, अभिनेत्रींनाही कास्टिंग काउचसारख्या हिंसेला सामोरं जावं लागतं. जगभरातून याविरोधात आवाज उठवणारी #MeTooही सोशल मीडिया चळवळ सुरु झाली. सोशल मीडियावर महिला त्यांच्यावर होण्याऱ्या अत्याचारावर व्यक्त झाल्या. पण, तरीही आजदेखील तीन पैकी एका महिला शारीरिक किंवा लैंगिग छळाची शिकार होते. घरगुती अत्याचार, बलात्कार, महिलांची तस्करी आणि लिंगाच्या आधारावर होणारी हिंसा अशा गंभीर समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते. आनंदी, सुखी आणि सुरक्षित जीवनापासून त्या कुठेतरी लांबच आहेत. 

Image result for child marriage

6. बालविवाह
बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी अनेकांना लढा दिला. तरीही त्याची पाळेमुळे अजुनही रुतलेली दिसतात. देशातच नाही तर जगभरातून मुलींचा बालविवाह केल्याचे आकडे समोर येतात. अधिकतर प्रकरणे समोरही येत नाहीत किंवा पोलिसांपर्यंत त्याची नोंद होत नाही. बालविवाह रोखण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी अनेक सिनेमे, मालिका तयार केल्या गेल्या आहेत. 2011 ते 2020 या दशकामध्ये जवळपास 140 दशलक्ष मुलींचा बालविवाह होण्याची शक्यता वर्तवली गेली. 18 वर्षांआधी लग्न लावून दिलेल्या या मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले जाते. वयाने लहान असलेल्या या मुलींना अकाली बाळंतपण, जोडीदाराकडून जबरदस्ती किंवा हिंसाचाराला सामोरं जावं लागतं. 

महिलांशी संबंधित आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

7. FGM प्रथेसाठी शारीरिक छळ 
Female Genital Mutilation म्हणजेच FGM. World health Organization ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमध्ये महिलांच्या जननेंद्रिय अवयवांना हेतुने इजा पोहोचवली जाते. ही प्रक्रिया कोणत्याही वैद्यकिय कारणासाठी केली जात नाही. ही प्रथा धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांसाठी केली जाते. ही प्रक्रिया फक्त मुलींच्या आरोग्यासोबत खेळत नाही तर लहान मुलींच्या मनावर, शरीरावर परिणाम करते. 

8. पाणी आणि स्वच्छता 
जिथे पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची कमी असते तिथे सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. शाळेमध्ये शौचालय नसल्यास मुली मासिक पाळीच्या काळात शाळेत जाणे टाळतात. स्वच्छ पाणी नसल्यानेही आरोग्यासंबंधी अनेक आजार जडतात. 

9. लैंगिक समानता 
देशात किंवा जगात कितीही प्रगती झाली तरीही नेतृत्वाची सुत्रेही पुरुषांकडेच असल्याचं चित्र पाहायला मिळते. आजही कागदांपासून सर्वत्र स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. कामाच्या ठिकाणी महिलांना संधी उपलब्ध नाही. वेतनही पुरुषांच्या तुलनेने कमी मिळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rutuja Kadam writes womens day special feature issues worldwide