मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्याची ही साधी पद्धत... 

सुस्मिता वडतीले 
Thursday, 20 February 2020

मला अनेक नवनवीन डिशेस बनवायची आवड आहे. तसेच माझ्या हाताने बनवलेल्या मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हलवा आवडीने खातात. त्यामुळे मी आवर्जून नेहमी हलवा बनवते. 
- सीमा पकाळे

साहित्य : मुगाची डाळ 150 ग्रॅम, दूध 200 मिली, साखर 150 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम, मावा 50 ग्रॅम, बदाम 25 ग्रॅम. 
कृती : प्रथम मुगाची डाळ साफ करून पाण्यात पाच-सहा तासांपर्यंत भिजत ठेवावी. त्यानंतर ती मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावी. एका कढईत तूप गरम करून बारीक केलेली डाळ मिसळावी. पाच मिनिटांनी मंद गॅसवर हलके भाजत राहणे. जेव्हा ही डाळ तूप सोडेल तेव्हा दूध घालून गॅसवर शिजवून घेणे. तूप सुटल्यावर त्यावरून साखर घालणे व पुन्हा शिजवून घेणे. तयार मुगाच्या डाळीचा हलवा डिशमध्ये सर्व्ह करणे. त्या डिशवर मावा, बदाम अन्य सुखामेव्याची सजावट करून खायला देणे. 

मला अनेक नवनवीन डिशेस बनवायची आवड आहे. तसेच माझ्या हाताने बनवलेल्या मुगाच्या डाळीचा हलवा सर्वांना आवडतो. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हलवा आवडीने खातात. त्यामुळे मी आवर्जून नेहमी हलवा बनवते. 
- सीमा पकाळे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This simple method of making of halwa