Women's Day : 'आहे ना ती... घेईल सांभाळून!'

सायली क्षीरसागर
Saturday, 7 March 2020

देशात स्त्रियांसमोर असलेली चॅलेंजेस, तिची सुरक्षितता, तिच्यावर होणारे अत्याचार, तिला दिली जाणारी वागणूक या आणि अशाच गोष्टी लगेच आठवल्या. मग वाटलं की, वुमन्स डे नक्की साजरा कशासाठी करायचा?

'वुमन्स डे'निमित्त लेख लिहायचा ठरवल्यावर पॉझिटीव्हपेक्षा सगळ्या निगेटीव्ह गोष्टीच लगेच डोळ्यासमोर आल्या. त्या अशा की, देशात स्त्रियांसमोर असलेली चॅलेंजेस, तिची सुरक्षितता, तिच्यावर होणारे अत्याचार, तिला दिली जाणारी वागणूक या आणि अशाच गोष्टी लगेच आठवल्या. मग वाटलं की, वुमन्स डे नक्की साजरा कशासाठी करायचा? तिला शक्तिशाली बनविण्यासाठी की तिच्यासोबत होणाऱ्या अयोग्य गोष्टी उगाळत बसण्यासाठी...? बाईने कायम रडत राहण्यापेक्षा ती या अव्हांनावर भारी कशी पडते, त्यासाठी ती काय काय करते हे आठवूनच अनेकदा बळ मिळतं... 

महिलांशी संबंधित विविध कोर्सेसची माहिती मिळवण्यासाठी येथे - क्लिक करा

बाईने मोठमोठ्या आव्हांनांवर मात करत यश संपादन करण्याची परंपरा आपल्याकडे अगदी पूर्वापार आहे. मग ती सीता असो किंवा द्रौपदी! संत ज्ञानेश्वरांची लाडकी लहान बहिण मुक्ताई... मुघलांच्या भयंकर आक्रमणाच्या काळात शिवबांवर उत्तम संस्कार करुन स्वराज्याचे स्वप्न बाळगणाऱ्या जिजाऊ, संभाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या येसूबाई, त्यानंतरच्या कर्मठ काळात महिला शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सावित्रीबाई, लहान वयात शिक्षण घेऊन डॉक्टरकीची पदवी घेणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई, महिला शिक्षणासाठी झटणाऱ्या रमाबाई रानडे अशी जितकी नावं घेऊ तितकी कमी आहेत. यांना अडचणी नसतील, संघर्ष करावा लागला नसेल, विचित्र परिस्थितींचा सामना करावा लागला नसेल? उलट आतापेक्षा या सगळ्याजणींनी प्रचंड भोगलंय, यातूनही सावरत, चिकाटीने त्या पुढे गेल्या आहेत. हेच आताच्या मुलीही शिकतायत... अडचणी आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा यांनी मार्ग शोधले, एकट्या लढल्या पण ध्येयापर्यंत गेल्या... प्रचंड इच्छाशक्ती आणि कतृत्त्वाच्या जोरावरच त्या त्यांचं अंतिम ध्येय साध्य करू शकल्या. 

Image result for jijau
जिजाऊ आणि शिवबा

Image result for savitribai phule
सावित्रीबाई फुले

Image result for anandibai joshi
डॉ. आनंदीबाई जोशी

Women's Day: महाराष्ट्राने नाही, 'या राज्यांनी दिल्या महिला मुख्यमंत्री!

या दिग्गज महिलांचाच वारसा आता सध्याच्या काळातील महिला पिढी पुढे चालवत आहेत. पराभव पत्करत, पडत, पुन्हा उभारी घेत त्या यशाकडे जोरदार वाटचार करत आहेत. देशात आव्हानं खूप आहेत. नेहमीच महिलांच्या आव्हांनांबद्दलच बोललं जातं. ही आव्हानं जगानं पत्करली आहेत, पण त्या आव्हानांवर मात कशी करायची, मार्ग कसे शोधायचे याबाबत मात्र कोणी फारसं बोलताना दिसत नाही... 'आहे ना ती.. घेईल सांभाळून!' असं म्हणत नवऱ्यापासून मुलांपर्यंत सगळेचजण तिच्यावर निर्धास्त असतात. मात्र, अडचणींची वाच्यताही न करता मार्ग काढणारीही तीच असते. त्यामुळे आजही ती शक्तिशाली आणि सामर्थ्यवान आहे. 

Women`s Day : देशातच नव्हे, जगभरात महिलांच्या अडचणी सारख्याच; काय आहेत आव्हाने?

असं कोणतंच क्षेत्र नाही, जिथे स्त्री अग्रेसर नाही. तुम्ही फक्त नाव घ्या, त्या क्षेत्रात स्त्रीचं नाव पुढे घेतलं जातंच. सगळ्यात अवघड अशा लष्करातही स्त्रीला आता नेतृत्त्व मिळालं आहे, ते केवळ तिने मात केलेल्या आव्हांनांमुळे. अगदी जन्माला येण्यापासूनच आव्हानं पेलत ती जगात प्रवेश करते. त्यातही कधीतरी तिला जगात येण्यापासूनच रोखलं जातं. नंतर शिक्षणासाठी संघर्ष, महाविद्यालयात वावरताना येणारी बंधनं, नोकरीत नेतृत्त्व करायला मिळाल्यास पुरूषांचा हर्ट होणारा इगो, त्यानंतर प्रेम-लग्न निभावण्यासाठी आव्हानं, मुला-बाळांना उत्तम आयुष्य मिळावं यासाठी तिनं केलेलं करिअरचं कॉम्प्रमाईज यामुळे तिला किती गृहित धरलं जातं हे लक्षात येऊ शकतं...

Image result for strong women in india

पण म्हणतात ना, स्त्रीकडे बळंच इतकं असतं की, तिने ठरवलं तर ती काहीही करू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Article on women s Day 2020 by Sayali Kshirsagar