माय फॅशन : ‘व्यक्तिमत्त्वाला साजेसे पोशाख परिधान करा’

मी सध्या ‘अँड टीव्ही’वरील ‘बालशिव’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. अभिनय क्षेत्रात असल्याने मला लाइफस्टाइल व फॅशन या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
srushti maheshwari
srushti maheshwarisakal
Summary

मी सध्या ‘अँड टीव्ही’वरील ‘बालशिव’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. अभिनय क्षेत्रात असल्याने मला लाइफस्टाइल व फॅशन या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

- सृष्टी माहेश्वरी

मी सध्या ‘अँड टीव्ही’वरील ‘बालशिव’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. अभिनय क्षेत्रात असल्याने मला लाइफस्टाइल व फॅशन या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. बहुतांश वेळा मला लिनन पॅँट्स व पायजम्यासोबत सैल पूर्ण हाताचे टॉप किंवा टी-शर्ट घालायला आवडतात. कारण त्‍यामध्‍ये खूपच आरामदायी वाटते; पण आजकाल माझे आवडते ‘गो-टू आऊटफिट’ हाय-वेस्‍टेड डेनिमसह क्रॉप टॉप आहे. मला शॉर्ट ड्रेस घालायलादेखील आवडतात, कारण माझ्या मते, मी त्‍यामध्‍ये छान दिसते. शूटिंगदरम्‍यान सेटवर नेहमीच मी अशा पेहरावांमध्‍ये पाहायला मिळीन.

मी अशी व्‍यक्‍ती नाही, जी कोणताही पोशाख घालू शकते. स्‍पष्‍टपणे सांगायचे झाले, तर मी बाहेर पडण्‍यापूर्वी अनेक पोशाख घालून पाहते. मी अधिक प्रयोग करत नाही आणि तयार होण्‍यास अधिक वेळही घेत नाही. माझ्या मते तुमच्‍या व्‍यक्तिमत्त्वाला साजेसे पोशाख घालणे सर्वांत महत्त्वाचे आहे. आपण सर्व विभिन्‍न आहोत आणि म्‍हणूनच आपल्‍या फॅशन आवडीदेखील वेगवेगळ्या आहेत. मात्र, व्‍यक्तिमत्त्वाला साजेसे पोशाख घालणे महत्त्वाचे आहे, कारण तुमच्‍या पोशाखामधून तुमचे व्‍यक्तिमत्त्व दिसून येते. मग ते डिझाइन, रंग असो किंवा स्‍टाइल असो. इतरांपेक्षा वेगळाच लूक दिसेल असे आऊटफिट्स घालणे टाळावे.

माझा फॅशन फंडा प्रसंगानुसार पोशाख घालणे हा आहे. त्यामुळे मला आरामदायी वाटण्‍यासोबत माझे व्‍यक्तिमत्त्व त्‍यामधून दिसून येईल आणि माझ्या मूडनुसार असेल; हे काही अवघड नाही. प्रत्‍येकजण ते सहजपणे फॉलो करू शकतात. आरामदायी वाटणारे, तुमच्‍या स्‍टाइला शोभून दिसणारे आणि तुमच्‍या सर्वोत्तम व्‍यक्तिमत्त्वाला समोर आणणारे पोशाख परिधान करा.

माझ्यासाठी रंग निवडणे फारसे अवघड नाही. माझा कोणताही विशिष्‍ट आवडता रंग नाही. मी सर्व रंगांचे पोशाख घालते; पण मी ऋतू किंवा प्रसंगांनुसार रंगांची निवड करते. उन्‍हाळ्यामध्‍ये ते पेस्‍टल्‍स रंग असू शकतात. मी पावसाळ्यासाठी गडद व ब्राइट रंगांची निवड करते आणि पार्टीसाठी अधिक दिमाखदार व ब्राइट रंगांची निवड करते. मला प्रियांका चोप्राची स्‍टाइल आवडते. ती सर्वांत कम्फर्टेबल व स्‍टायलिश पोशाख परिधान करते; पण पारंपरिक पोशाखासाठी मी कंगना राणावत व ऐश्‍वर्या राय यांच्‍याकडून प्रेरणा घेते. माझ्या मते त्‍या साड्यांमध्‍ये खूपच आकर्षक दिसतात.

फॅशन टिप्स

  • प्रसंगानुसार योग्‍य पोशाख परिधान करा.

  • तुम्‍हाला सर्वोत्तम दिसणारे व न दिसणारे पोशाख याबाबत मनात निश्चित करा.

  • मेक-अप साधा ठेवा. अधिक प्रमाणात मेक-अप करू नका.

  • तुमच्‍या लूकला पूरक असे स्‍टायलिश ग्‍लासेस व हँडबॅग अशा अॅक्‍सेसरीज नेहमी सोबत ठेवा.

  • आरामदायी वाटतील असे पोशाख परिधान करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com