पेट्रोलची नव्हे, चार्जिंगची काळजी

Vehicle
Vehicle

झूम... - चंद्रकांत दडस
नव्या नियमांची अंमलबाजवणी
एप्रिल २०२०पासून वाहन उद्योगासाठी नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपन्यांना सध्याच्या दुचाकी वाहनांमध्ये बदल करावे लागतील. व्यावहारिक पातळीवर बदल करणे शक्‍य नसलेल्या मॉडेलची विक्री बंद होण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणाला अनुसरून २०२० व २०२१मध्ये बाजारात येणाऱ्या इलेक्‍ट्रिक दुचाकी वाहनांची प्रारूप व प्रत्यक्ष उत्पादनासाठी तयार वाहने वाहन मेळाव्यात (ऑटो एक्‍स्पो) दिसण्याची शक्‍यता आहे.

५० टक्के गाड्या इलेक्ट्रिक
जागतिक मानकांच्या धर्तीवर बजाज ऑटो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, कावासाकी, ट्रायम्फ, केटीएम, अप्रीला आदी कंपन्यांच्या नवीन दुचाकी बाजारात येणार आहेत. पुढील वर्षी बाजारपेठेत १० किंवा त्यापेक्षा अधिक दुचाकी येतील. त्यापैकी सुमारे ५० टक्के गाड्या इलेक्‍ट्रिकसाठी सक्षम असतील.

१२५ सीसीची वाहने येणार
सध्या बाजारपेठेत सर्वाधिक विकला जाणारा सेगमेंट हा ११० सीसीचा आहे, पण वाहनांचे मानक बदलणार असल्याने काही कंपन्यांकडून ११० सीसीऐवजी १२५ सीसीची वाहने सादर करण्यावर भर दिला जाईल. 

इलेक्‍ट्रिक स्कूटर अधिक
‘बजाज’ची चेतक आणि ‘हीरो’ची  इलेक्‍ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात येणार आहे. रिव्होल्ट आरव्ही कॅफे रेसर, लंबरेटा जी स्पेशलच्या इलेक्‍ट्रिक स्कूटर बजाज चेतकला टक्‍कर देतील. लंबरेटा पुन्हा आपली उत्पादने सादर करणार असल्याने भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com