
सध्या राज्यात मॉन्सून सर्वदूर पोचला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. ते टाळण्यासाठी काही उपाय नक्की आहेत. थोडी खबरदारी घेतल्यास दुर्घटना नक्की टळू शकतात.
सध्या राज्यात मॉन्सून सर्वदूर पोचला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. ते टाळण्यासाठी काही उपाय नक्की आहेत. थोडी खबरदारी घेतल्यास दुर्घटना नक्की टळू शकतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाहनाची वेळेवर सर्व्हिसिंग
कार असो अथवा बाईक, पाऊस सुरू होण्यापूर्वी वाहनाची चांगल्याप्रकारे तपासणी करा. पावसाळ्यात आपले वाहन व्यवस्थित चालण्यासाठी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. सध्या अनेक वाहन कंपन्या ग्राहकांसाठी फ्री मॉन्सून चेकअपचे आयोजन करतात. या संधीचा फायदा घ्या.
उत्तम टायर
पावसाळ्यात कार अथवा बाईकला बाहेर काढण्यापूर्वी टायरची तपासणी आवर्जून करा. टायर जास्त झिजले असतील किंवा ग्रिप पकडत नसतील, तर ते तत्काळ बदलून नवे टाका. पावसाळ्यात वाहन घसरून अपघात होण्याचे प्रमाण मोठे असते, त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी ही काळजी घेणे आवश्यक ठरते.
वाहन सावकाश चालवा
तुम्ही घर किंवा ऑफिसमधून निघताना पाऊस येत असल्यास कार अथवा बाईक हळू चालवा. वाहन सांभाळता येऊ शकेल, इतकाच वेग असू द्या. लोक घाईत असल्याने वाहनावरील आपले नियंत्रण सोडून देतात. हेच अपघाताचे मोठे कारण ठरते.
उत्तम दर्जाचे हेल्मेट
बाईक चालवत असताना हेल्मेट घालणे अतिशय आवश्यक आहे. पावसाळ्यात तर हेल्मेट आणखी आवश्यक ठरते. हेल्मेट खरेदी करताना ते आयएसआय मार्कचे आहे ना हे तपासून घ्यावे. पावसाळ्यात हेल्मेटवर धुके जमा होते. त्यामुळे अँटी फॉग हेल्मेटचा वापर करा.
पाण्यात उतरू नका
पाणी साठलेल्या रस्त्यावरून जाताना अनेक वाहनचालक पाण्यामध्ये उतरून पाण्याचा अंदाज घेतात, मात्र हे धोकादायक आहे. रस्त्याखालून अनेक मोठी गटारे असतात. पावसाळ्यात या गटारांची मॅनहोल (भुयारी गटारद्वारे) उघडी असतात. चुकून यात पाय गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन पाणी कमी होण्याची वाट पाहा.
ब्रेकवर लक्ष
कार आणि बाईकचे ब्रेक पावसाळ्यात तातडीने नीट करून घ्या. त्यामुळे अचानक ब्रेक लावल्यानंतर होणारी दुर्घटना टळू शकते. पावसात ब्रेकमध्ये पाणी जाते. त्यामुळे ब्रेक खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे ब्रेकची वारंवार तपासणी करा.