झूम... : मायलेज कितना हैं!

चंद्रकांत दडस
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

देशात वाहनांबाबत पहिल्यांदा विचारले जाते, ते म्हणजे मायलेज किती देते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता असे विचारणे काही गैर नाही. यामुळेच वाहनाचे मायलेज कसे वाढवायचे, यासाठीच्या काही टिप्स 

देशात वाहनांबाबत पहिल्यांदा विचारले जाते, ते म्हणजे मायलेज किती देते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता असे विचारणे काही गैर नाही. यामुळेच वाहनाचे मायलेज कसे वाढवायचे, यासाठीच्या काही टिप्स 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१) वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा
अनेक लोक असा विचार करतात, की जितक्‍या जोरात गाडीचा वेग असेल तितके गाडीला पेट्रोल, डिझेल कमी लागेल. मात्र, असा चुकीचा विचार कधीही करू नका. रस्त्यावर दिलेल्या नियमांनुसार वाहनाचा वेग ठेवल्यास कारच्या मायलेजमध्ये वाढ होते. वाहनाचा वेग एका गतीत ठेवल्यास मायलेजमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.

२) वेळेवर ऑइल बदला
अनेक जण फक्‍त वाहनामध्ये पेट्रोल भरले की काम झाले, असे समजतात. मात्र, ते या वेळी वाहनाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. वाहनाला चांगल्या स्थितीत ठेवायचे असल्यास आपल्या वाहनाचे ऑइल वेळेवर बदलत राहा. याच वेळी वाहनाची नियमित तपासणीही करा. गाडीचे लहान लहान पार्ट खराब झाल्यास लगेच बदलून घ्या. असे केल्याने वाहनाला अनेक वर्षे उत्तम मायलेज मिळत राहते.

३) वाहन खूप वेळ सुरू ठेवू नका
वाहतूक कोंडी अथवा सिग्नलवर अनेक वेळा आपण वाहन तसेच सुरू ठेवतो. असे कधीही करू नका. यामुळे इंधन अधिक जळते, तसेच मायलेजवरही परिणाम होतो.

४) क्रूज कंट्रोलचा वापर करा
महामार्गावर वाहन चालवताना नेहमी क्रूज कंट्रोल फीचरचा उपयोग करा. यामुळे आपल्याला सतत गती कमी करण्याची आवश्‍यकता राहत नाही. एकसमान गतीत वाहन चालवल्यामुळे वाहनाच्या मायलेजमध्येही वाढ होते, तसेच आपल्याला आरामही मिळतो.

५) वाहन योग्य पद्धतीने चालवा
आपण अनेकदा वाहनाची गती वाढवून अचानक कमी करतो. असे करण्यामुळे वाहनाच्या इंजिनवर दाब येतो. याचा मायलेजवर परिणाम होताना दिसून येतो. एका वेगमर्यादेमध्ये वाहन चालवण्याचा प्रयत्न करा. दुचाकी प्रतितास ५० ते ६० किमी, तर कार ६० ते ७० किमी या वेगाने चालवल्यास अधिक मायलेज मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Chandrakant Dadas on vehicle mileage