गॅजेट्स : दमदार मोबाईल दाखल

Mobile
Mobile

भारतीय बाजारपेठेत अल्पावधीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रिअलमीने पहिला ५ जी मोबाईल सादर केला आहे. त्याशिवाय 65W सुपरडार्ट फास्ट चार्जिंग, WiFi 6 असलेला आणि पहिला LPDDR5 रॅम असलेला फोन रियलमीने बाजारात आणला.

भारतात नुकत्याच सादर करण्यात आलेल्या iQoo या विवोच्या नव्या सबब्रॅंडच्या पहिल्या ५ जी मोबाईलसोबत या मोबाईलची स्पर्धा असणार आहे. सध्या भारतात ५जी मोबाईल सादर करण्याची स्पर्धा असली, तरी केवळ फोन ५ जी आहे म्हणून खरेदी करण्यास काही अर्थ नाही. कारण, भारतात ५जी सेवा सुरू होण्यास काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि विविध सुविधा असलेला मोबाईल सॅमसंगने ‘सॅमसंग गॅलेक्सी एम-३१’ बाजारात आणला आहे.

रिअलमी एक्स ५० प्रो ५ जी

  • डिस्प्ले : ६.४४३ इंची अल्ट्रा स्मूथ सुपर एमोएलईडी ९० हर्टझ् डिस्प्ले 
  • प्रोसेसर : क्‍वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ 
  • रॅम : ६, ८, १२ जीबी (प्रकार ः एलपीडीडीआर ५)
  • मेमरी : १२८, २५६ जीबी 
  • बॅक कॅमेरा : ६४ मेगापिक्‍सल क्वाड कॅमेरा + १२ मेगापिक्‍सल टेलिफोटो + ८ मेगापिक्‍सेल अल्ट्रावाइड ॲण्ड मॅक्रो लेन्स + २ मेगापिक्‍सल पोर्ट्रेट लेन्स
  • फ्रंट कॅमेरा ः ३२ मेगापिक्‍सल वाइड अँगल + ८ मेगापिक्‍सल कॅमेरा
  • बॅटरी : ४२०० एमएएच, ६५ वॉट सुपरडार्ट फास्ट चार्ज
  • ऑपरेटिंग सिस्टिम : रिअलमी यूआय असलेले खास अँड्रॉइड १०
  • किंमत -
    ६ जीबी +१२८ जीबी ः    ३७,९९९
    ८ जीबी + १२८ जीबी :    ३९,९९९
    १२ जीबी + २५६ जीबी :    ४४,९९९ 

सॅमसंग ‘गॅलेक्सी एम-३१
सॅमसंग कंपनीनेही बाजारात काही दमदार मोबाईल फोन दाखल केले होते. यामध्ये ‘गॅलेक्सी एम-३१’ या मॉडेलाचा बोलबाला आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात...

  • डिस्प्ले :  ६.४ इंची, पिक ब्राइटनेस
  • प्रोसेसर : सॅमसंग एक्स्नो ९६११ 
  • रॅम : ६ जीबी  
  • मेमरी : ६ जीबी 
  • बॅक कॅमेरा :  ६४ मेगापिक्‍सेल  मेन + ५ मेगापिक्‍सल डेफ्ट + ५ मेगापिक्‍सल मायक्रो + ८ मेगापिक्‍सल अल्ट्रावाइड 
  • बॅटरी : ६००० एमएएच 
  • ऑपरेटिंग सिस्टिम : ॲन्ड्रॉईड
  • किंमत  -
    ६ जीबी + ६४ जीबी - १५,९९९
    ६ जीबी + १२८ जीबी - १६,९९९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com