टिवटिवाट : मदतीच्या हातांसाठी...

Sakal-Media
Sakal-Media

भारतातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात कुणाला रक्ताची आवश्यकता असते. प्रसंग आणीबाणीचा आणि जगण्या-मरण्याचा असतो. कोणीतरी ट्विट करते, ‘अमुक हॉस्पिटलमधल्या तमुक पेशंटला रक्ताची आवश्यकता आहे.’ कोणीतरी आणखी माहितगार @BloodDonorsIn हँडलला टॅग करतो. हँडलवरून काही मिनिटांतच दहा लाखांवर ट्विटर युजर्ससाठी आवाहनाचे ट्विट केले जाते. संबंधित रुग्णाची गरज भागविली जाते. मदतीचा हा ‘डिजिटल हात’ गेले साठ-आठ वर्षं सुरू आहे. दोन वर्षांपासून ट्विटर कंपनीनं #BloodMatters उपक्रम सुरू केलाय आणि पहिल्या दिवसापासून @BloodDonorsIn या उपक्रमाचा भागीदार आहे.

भारतात वार्षिक तेरा लाख बाटल्या रक्ताची आवश्यकता आहे. देशभरातल्या कुठल्या कुठल्या शिबिरांमधून अकरा लाख बाटल्या रक्त जमा होतं. तरीही रक्ताच्या दोन लाख बाटल्या कमी पडतात. वेळेत रक्त न मिळाल्यानं होणाऱ्या मृत्यूंची नेमकी नोंद मिळत नाही; त्यामुळं भीषण वास्तव समजत नाही. ट्विटरवरच्या या मदतीच्या हातांचे कोणी अनामिक आभार मानतो, तेव्हा रक्तदानाचं महत्त्व तर कळतंच; शिवाय सोशल मीडियाची चांगली बाजूही समोर येते. ट्विटरवर रक्तदात्यांचा देशव्यापी विशाल समूह उभा करण्याची संकल्पना ज्यानं कुणी मांडली आणि उभी केली, त्यानं अनामिक राहणं पसंत केलं.

राजकीय मतभिन्नतेतून ट्विटरवरून धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला मदतीचे हातही. या हातांना बळकट करण्याचं काम करायचं असेल, तर असे उपक्रम शोधा आणि जरूर कळवा #TweetToSakal हॅशटॅगवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com