टिवटिवाट : ‘पुरुषी भाषा’

Sakal-Media
Sakal-Media

एक तरुणी राजकीय नेतृत्व करतेय. तिच्या मतांविषयी तुमची मतभिन्नता असू शकते. तिचं मत मान्य केलंच पाहिजे, हा तिचा आग्रह राजकीय आहे; म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू शकता किंवा प्रतिवादही घालू शकता.

पण, ती तरुणी आहे आणि एक बाई आहे; म्हणून तिला कमी लेखण्याची मानसिकता म्हणजे आपण २०२० मध्ये नाही, तर मध्ययुगाच्याही मागं कुठंतरी आहोत, हे दर्शवून जातं.

हा संदर्भ आला, सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेत. ‘तिची भाषा बघा ओ... पुरुषासारखं बोलते,’ अशी प्रतिक्रिया एकानं हेटाळणीच्या सुरात नोंदवलेली आणि त्याला अनुमोदन देणारी आणखी काही मंडळी होती.

सोशल मीडियानं आपल्याला स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी हक्काची जागा दिली. जे खटकतं आणि जे आवडतं असं सर्वकाही सहजपणानं व्यक्त व्हायला सुरुवात झाली. पण, जेव्हा स्त्रियांनी कुठली भाषा वापरायला पाहिजे, हे काही लोकं डिक्टेट करायला लागतात, तेव्हा बुरसट मानसिकताही सोशल मीडियावर वावरायला लागते. महिला नेत्या, कार्यकर्त्या, लेखिका यांना या मानसिकतेचा सर्वाधिक सामना रोजच्या रोज सोशल मीडियात करावा लागतोय, अशी आजची परिस्थिती आहे.

ही परिस्थिती बदलायची असेल, तर भाषेची पुरुषी आणि स्त्रीव्यवस्था, अशी विभागणी बदलावी लागेल. शिवाय, असं भाषा डिक्टेट करू पाहणाऱ्या मानसिकतेला आवरावं लागेल. ते आवरणं आपल्या हातात आहे. कारण, अशा मानसिकतेचा प्रवास कधी भाषेवरच थांबत नसतो. तो कपड्यांवर, विचारांवरही अतिक्रमण करतोच...

तेव्हा, अशी भाषा आवरण्याचा संदेश आपणही देऊया #TweetToSakal हॅशटॅग वापरून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com