टिवटिवाट : घडलेल्या गोष्टींना दिशा देण्याचा प्रयोग

Kangana-and-narendra
Kangana-and-narendra

काही गोष्टी घडत जातात, काही ठरवून घडतात, मात्र काही गोष्टी घडल्यानंतर त्यांना दिशा देता येते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, त्यावरून अभिनेत्री कंगना राणावत महाराष्ट्र सरकारशी घेतलेला पंगा, बिहारमधील निवडणुकीची रणधुमाळी, या रणधुमाळीत सुशांतसिंहचं बिहारीपण वारंवार जागवणं आणि कंगनाचा हिंदुत्वाचा पुकारा यामध्ये वरकरणी काहीच साम्य नाही. मात्र, त्याला आता पुरेशी राजकीय दिशा मिळालेली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कलाकाराचं राजकीय विचारसरणीकडं झुकणं गैर नाही. ते एका रात्रीत होत नसतं, इतकंच. कंगनाचे आवडते नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी. गमतीचा भाग म्हणजे दोघांच्या गेल्या सहा वर्षांतील वाटचालीत कमालीचे साम्य. ते पाहिले, की गोष्टी घडल्यानंतर त्यांना राजकारणासाठी दिशा देण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे, यावर विश्वास बसू लागतो.    यालाच प्रोपगंडा म्हणतात का?

१.     कंगना राणावतचा ‘क्वीन’ मार्च २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. सुपरहिट ठरला. कंगना स्टार बनली. तिची आधीची सात वर्षांची स्ट्रगल आता यशकथा बनली. तिचा २०११ चा ‘तनू वेड्‌स मनू'' चांगला चित्रपट होता; कौतुकही झालेलं. पण कंगनाला बॉलिवूडमधलं स्टारडम नव्हतं.
२.     आपण छोट्या गावातली सामान्य कुटुंबातली मुलगी आहोत, हे कंगना वारंवार सांगते. छोट्या गावातली छोटी मुलगी बॉलिवूडची स्टार बनलीय, हे ती ठसवते.
३.     कंगना बॉलिवूडमधल्या नेपोटिझमवर; घराणेशाहीवर तुटून पडते. विशिष्ट कुटुंबातल्या लोकांना बॉलिवूडमध्ये जागा दिली जाते, हे तिनं सांगते.
४. बॉलिवूड इस्लाम-फ्रेंडली असल्याचा धडधडीत राजकीय आरोप कंगना करते.

कंगनाचे आवडते राजकीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी. तिनं सातत्यानं मोदींचं कौतुक केलंय. लोकशाहीचे सर्वांत लायक नेते मोदी आहेत, असं तिनं २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी म्हटलेलं.

१.     मार्च २०१४ला देशानं नरेंद्र मोदींचा झंझावात पाहिला. त्यांनी देश पिंजून काढला आणि केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आले. मोदी पंतप्रधान बनले. त्या आधी तीनवेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कामाचं कोडकौतुक होत होतं; मात्र ते राष्ट्रीय नेते बनलेले नव्हते.
२. आपण चहा विकला, वडनागरसारख्या गावात सामान्य कुटुंबातला आपला जन्म, हे मोदी वारंवार सांगतात. सामान्य कुटुंबातला माणूस पंतप्रधान बनला, हे ते दाखवतात.
३.     मोदी कॉंग्रेस पक्षातील घराणेशाहीवर तुटून पडतात. देशावर एकाच कुटुंबाचं सर्वाधिक काळ राज्य होतं, हे गेल्या सहा वर्षांत त्यांनी न चुकता सांगितलं.
४.     शक्‍य त्या ठिकाणी मोदी हिंदुत्वाबद्दल बोलतात. आज देशातील निर्णय प्रक्रियेत हिंदुत्व केंद्रस्थानी आहे.

सुशांतसिंह प्रकरणात कंगना विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोदी सरकारने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तिच्यासोबत असतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com