टिवटिवाट : जेएनयू आणि ‘डिपफेक’

Sakal-Media
Sakal-Media

सोशल मीडियावर ट्रेंड येतात आणि जातात. काही लक्षात राहतात आणि अनेक विस्मरणात जातात. तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या ट्रेंडवर चर्चा व्हायलाच हवी, तर जरूर कळवा #TweetToSakal हा हॅशटॅग वापरून.

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पाच डिसेंबरला गुडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला चढविला. एखाद्या विद्यापीठातली हाणामारी म्हणून कदाचित हा विषय तुमच्या-माझ्यापर्यंत आला नसताही. तो आला सोशल मीडियामुळं. हल्ला झाला आणि पाहता पाहता जेएनयूबद्दलच्या घडामोडींनी व्हॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुक भरून गेले. राष्ट्रीय टीव्ही चॅनेल्सही तातडीने जेएनयूकडे धावले. 

विद्यार्थ्यांची हाणामारी या विषयाला सोशल मीडियाने प्रारंभिक माहितीच्या पलीकडं नेलं. वैचारिक आणि सैद्धांतिक मतभेदांतून राजकीय विरोधाचा गळा घोटण्याचा रक्तरंजित कट जगासमोर आला. आईशी घोष हीचा रक्ताळलेला चेहरा लाखो लोकांपर्यंत पोचला. याच काळात बनावट फोटो खपवून अजेंडा लादण्याचा प्रकारही झाला. 

डिपफेक ॲप्स 
येत्या वर्षभरात सोशल मीडियावर बनावटगिरीचा प्रकार आणखी धुमाकूळ घालेल, असं दिसतंय. त्याला कारण आहे ‘डिपफेक’ ॲप्स! मॉर्फ शब्द कधीतरी कानावरून गेला असेल. एखाद्या फोटोमध्ये छेडछाड करणं म्हणे मॉर्फिंग. फेक फोटोच ते. गंमत म्हणून असा बदल होतो, तेव्हा ठिक आहे; पण गोंधळ माजविण्यासाठी झालेले बदल घातक ठरल्याचा इतिहास आहे. फोटोपेक्षा व्हिडिओमध्ये हवे तसे बदल करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि खूप वेळ लागतो.  टिकटॉक आणि स्नॅपचॅट ॲपमध्ये लवकरच व्हिडिओमध्येही असे बदल करण्याची सुविधा येईल. अशा तंतोतंट बनावट ‘डिपफेक’ ॲप्सना सुविधा म्हणावं, की नवी डोकेदुखी असा प्रश्न पडतोय. 

जेएनयूचा विषय आता गाजत राहील. काही ‘डिपफेक’ गोष्टी तुम्हाला खपविण्याचा प्रयत्नही होईल. तेव्हा 
सावध राहा... आम्हाला कळवा #TweetToSakal हॅशटॅगवर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com