अपना ट्रेंड आयेगा!

Tweet-to-sakal
Tweet-to-sakal

टिवटिवाट - सम्राट फडणीस
‘द अल्केमिस्ट’ या तब्बल पाच दशकं लोकप्रिय असलेल्या पुस्तकाचे लेखक पाओलो कोएलो यांचं नाव आठवड्यातून एकदा तरी ट्विटरवर गाजतं. कोएलो ब्राझीलियन. वय ७३. तरीही ते तुमच्या-माझ्यापर्यंत सहज पोचतात. त्याचं कारण त्यांचं ट्विट! सकारात्मक ऊर्जा आणि विचार देणारं कोएलो यांचं ट्विट यूझर्सना भावतं. यूझर्स रिट्विट करतात. मित्र-मैत्रिणींना टॅग करतात. कोएलोंना प्रतिक्रियेतून धन्यवाद देतात. त्यावर भाष्यही करतात.  

हे असं जगभरात सुरू होतं आणि मग कोएलो ट्विटर ट्रेंडमध्ये येतात आणि आपल्यापर्यंत पोचतात. अनेक लोक एकाच वेळी एकाच विषयावर लिहू-बोलू लागले, की तो विषय ट्रेंडिंगमध्ये येतो. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगच्या भाषेत सांगायचं, तर ट्रेंडमागं हा असा अल्गॉरिदम असतो. ट्रेंड काही कोएलोच घडवतात असं नाही. शिक्षकांच्या प्रश्नांकडं लक्ष वेधण्यासाठी नाशिकसह महाराष्ट्रातील कित्येक भावी-आजी शिक्षकांनी ‘#शिक्षकभरती’ हा ट्रेंड चालवला. राजकीय पक्ष, नेते यांना तर ट्रेंडमध्ये आल्याशिवाय आपलं म्हणणं व्यापक समूहापर्यंत नेताच येणार नाही, अशी आजच्या डिजिटल इंडियातली परिस्थिती आहे.

‘जल्लोष’मध्ये ट्विटरवरबद्दलच नव्हे; तर एकूण सोशल मीडियातल्या ट्रेंडवर आपण बोलणार आहोत. चर्चेला येणारे नवे विषय, त्याच्या बाजू, त्याचे कर्ते-धर्ते असा आपला शोधाचा विषय असणार आहे.

...आणि हो, तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या विषयावर चर्चा व्हायला हवीच, तर जरूर कळवा #TweetToSakal हा हॅशटॅग वापरून.

SakalMedia
@SakalMediaNews
सोशल मीडियावर ट्रेंड येतात आणि जातात. काही लक्षात राहतात आणि अनेक विस्मरणात जातात. तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या ट्रेंडवर चर्चा व्हायलाच हवी, तर जरूर कळवा #TweetToSakal हा हॅशटॅग वापरून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com