झूम... : शेरास ‘सव्वाशे’र!

Bike
Bike

बाइक्समध्ये अगदी शंभर सीसी इंजिनापासून सहाशे सीसी इंजिनापर्यंत अनेक प्रकार असले, तरी सर्वाधिक चलनी नाणं असतं ते म्हणजे सव्वाशे सीसी बाइक्सचं. शंभर सीसी बाइक्सपेक्षा या बाइक्स वरच्या दर्जाच्या असतात आणि पुन्हा जास्त सीसीच्या बाइक्सइतक्या त्या महागही नसतात. बाजारात नुकत्याच दाखल झालेल्या किंवा सध्या चर्चेत असलेल्या अशाच काही बाइक्सची माहिती घेऊ. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘हिरो ग्लॅमर’
एकेकाळी रस्त्याची शान असलेली ‘ग्लॅमर’ ही बाइक हिरो मोटोकॉर्पनं काही बदलांसह पुन्हा एकदा सादर केली आहे. तिचे रंग आणि बाह्यलूक मात्र आधीसारखंच ‘ग्लॅमरस’च आहे. हेडलाइट आणि टेललाइटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. नवीन ग्लॅमरला पाच गिअर्स आहेत. ‘ट्विन शॉक ॲब्सॉर्बर्स’मुळे नवीन ग्लॅमरचा प्रवास आरामदायी ठरणार आहे. ‘आय३एस’ स्टार्ट-स्टॉप सिस्टिम आणि ‘ऑटो सेल’ या सुविधा नवीन आहेत. स्टार्ट-स्टॉप सिस्टिममुळे क्लचच्या मदतीनं इंजिन चालू करणं शक्य आहे.
किंमत ७०,७१६ ते ७४,२१६ रुपये

‘बजाज पल्सर १२५’
बजाज पल्सर ही तरुणाईची क्रेझ आहे. तिचंच छोटं म्हणजे १२५ सीसीचं व्हर्जन ‘बजाज’नं आणलं आहे. ही ‘पल्सर १२५’ मोठ्या पल्सरसारखीच दिसते. मात्र, तिचं इंजिन छोटं आहे. तिचं वजनही १४२ किलो इतकं आहे. पेट्रोल टाकीची क्षमता १५ लिटर इतकी आहे. थोडा ॲनालॉग आणि थोडा डिजिटल असं मिश्रण असलेला तिचा डिस्प्ले हे एक आकर्षण असेल. ‘पल्सर १५०’ची बहुतांश वैशिष्ट्यं या १२५ सीसीच्या बाइक्समध्ये असल्यानं तरुणाईला तिची भुरळ पडू शकेल. 
किंमत ७१,०९१ ते ७९,१८७ रुपये

‘केटीएम-आरसी १२५’
‘केटीएम’नं ‘आरसी १२५’ नवीन रंगासह सादर केली आहे. बाकी इतर वैशिष्ट्यं आणि स्टाइल्स सारख्याच आहेत. इंजिन सिंगल-सिलिंडर आणि फ्युएल-इंजेक्टेड आहे. नवीन रंगसंगतीमध्ये टॅंकवर, मागच्या भागावर मेटॅलिक सिल्व्हर रंग आहे. बाइकवरचे ग्राफिक्स हे केटीएमच्या खास इलेक्ट्रिक ऑरेंज रंगानं तयार करण्यात आले आहेत. स्पोर्ट्स बाइक्स आवडणाऱ्यांना ही नव्या रंगांतली बाइक आवडू शकेल. 
किंमत १, ५८,७९७ रुपये 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com