हिरो स्प्लेंडर आता नव्या लूकमध्ये; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

Hero MotoCorp ने त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय अशी हिरो स्प्लेंडर प्लस नव्या लूकमध्ये आणली आहे.

नवी दिल्ली - Hero MotoCorp ने त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय अशी हिरो स्प्लेंडर प्लस नव्या लूकमध्ये आणली आहे. ब्लॅक एक्सेंट एडिशन कंपनीने सादर केली आहे. कंपनीची लोकप्रिय असलेली ही बाइक टॉप टू व्हीलर्सच्या यादीतही आघाडीवर असते. 

हिरो स्प्लेंडरची नवी गाडी 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात फायरफ्लाय गोल्डन, बीटल रेड आणि बंबल बी यलो कलरचा पर्याय आहे. गाडीला आकर्षक करण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागतील. यात 1399 रुपयांमध्ये गाडीवर Hero चा 3D लोगोही लावता येणार आहे. 

Splendor Plus बाइकमध्ये 97.2cc क्षमतेचं सिंगल-सिलिंडर आणि एयर-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. याची पॉवर 8,000rpm प्रति 7.8 bhp इतकी आहे. तसंच  6,000rpm वर  8.05Nm इतका टॉर्क जेनरेट होतो.  ट्यूबलेस टायर्स देण्यात आले असून 130mm रियर ब्रेक आहेत.

हे वाचा -  बेस्ट बाइक्स : शेरास ‘सव्वाशे’र!

Hero Splendor Plus च्या ब्लॅक एंड एक्सेंट व्हेरिअंटची किंमत 64,470 रुपये आहे. हिरो स्प्लेंडरच्या किक स्टार्टच्या मॉडेलची किंमत 60,500 रुपये झाली आहे. तसंच सेल्फ स्टार्ट मॉडेल 62 हजार 800 रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय स्प्लेंडर प्लस सेल्फ स्टार्ट i3S मॉडेल 64,010 रुपयांपर्यत मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hero splender plus in new look know features and price

Tags
टॉपिकस
Topic Tags: