नव्या अवतारात दिसणार Mahindra Scorpio; जाणून घ्या कशी असतील फीचर्स

टीम ई सकाळ
Saturday, 2 January 2021

स्कॉर्पिओ प्रेमींसाठी नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळू शकते. कंपनी स्कॉर्पिओचं नवीन व्हर्जन लाँच करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली - देशातील दिग्गज कार निर्मिती कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने स्कॉर्पिओ पहिल्यांदा 2002 मध्ये लाँच केली होती. ट्रॅक्टर्ससुद्धा तयार करणाऱ्या महिंद्राने SUV मध्येही आघाडीच्या इतर कंपन्यांना टक्कर दिली. स्कॉर्पिओचा खास चाहता वर्ग तयार झाला. आता स्कॉर्पिओ प्रेमींसाठी नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळू शकते. कंपनी स्कॉर्पिओचं नवीन व्हर्जन लाँच करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओचं आणखी एक नवीन जनरेशन अपडेटसह बाजारात आणू शकते. नव्या अपडेटेड व्हर्जनच्या डिजाईनपासून मेकॅनिकल्सपर्यंत नवीन अवतार बघायला मिळेल. याचे काही फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

हे वाचा - HBX - Tata ची नवी मायक्रो SUV कार; असतील खास फीचर्स

नव्या डिझाइनमध्ये एसयुव्हीपेक्षा अधिक लांब आणि उंच दिसत आहे. कारच्या पुढे नवीन सिग्नेचर ग्रिल आणि DRLS सोबतच ट्विन पॉड हेडलॅम्प असतील. एका बाजुने पाहिलं असता ही जुन्या गाडीसारखीच दिसते. नव्या आरश्यांमध्ये इंडिकेटर्स लावलेले असतील. गाडी मागच्या बाजुने पाहिली असता काही बदल नक्की दिसतील. साइड ओपनिंग टेल गेट पहिल्यासारखंच असणार आहे.

हे वाचा - इलेक्ट्रिक कार आणि चार्जिंग

नवीन स्कॉर्पिओमध्ये 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिन असेल. 185 पीएस पॉवरचं हे इंजिन आहे. तसंच थारमध्ये वापरण्यात आलेलं 2 लीटर पेट्रोल इंजिनही यामध्ये असण्याची शक्यता आहे. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टरसुद्धा मिळू शकतो. महिंद्रा स्कॉर्पिओचं पुढचं व्हर्जन या वर्षीच्या मध्यापर्यंत लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत 13 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.
भारत भारत भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahindra-scorpio-may soon launch new-testing-scheduled