
यिन च्या वतीने वृक्षारोपण आणि संगोपनाची शपथ.
काटेवाडी ता. बारामती : सकाळ माध्यम समूहाच्या यिन आणि श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने काटेवाडी येथील बिरोबा देवस्थान परिसरात यिनचे महाविद्यालयीन अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी वड, पिंपळ, चिंच अशा प्रकारच्या, पाच फूट उंचीच्या झाडांचे रोपण केले.
वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे, पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे, यासाठी सर्व तरुणाईने पुढे येऊन पर्यावरण संरक्षण करणे महत्वाचे आहे.
दर वर्षी पावसाळ्यात सर्वत्र शेकडो झाडांचे रोपण तरुणाई करते, परंतु लहान झाडे लावल्याने त्यातील निम्मे हि जगत नाहीत. म्हणून प्रत्येक ग्रुप ने दहा झाडे, तेही किमान ४ ते ५ फूट उंच लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतो, अशी शपथ त्या ठिकाणी घेतली. त्या वेळेस शेखर मासाळ, अमितकुमार शेलार, प्रगती खाडे, आरती साबळे, मंगेश खरात, प्रीतम शिंगाडे आणि यिनचे पुणे ग्रामीण चे प्रतिनिधी सुजित मासाळ यांनी आयोजन केले होते.
Web Title: Oath Of Plantation And Care On Behalf Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..