मायक्रोसॉफ्टचा नवा ब्राऊजर

Microsofts New Browser
Microsofts New Browser

मायक्रोसॉफ्ट सातत्याने काही ना काही नवी उत्पादनं सादर करत असतं. नुकताच मायक्रोसॉफ्टने क्रोमियम आधारित एज ब्राऊजर सादर केला आहे. अनेक दिवसांपासून या ब्राऊजरवर चाचणी घेतली जात होती. अखेर गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टने ‘विंडोज’ आणि ‘मॅकओएस’साठी हा ब्राऊजर बाजारात आणला. काही दिवसांपूर्वी नव्या ब्राऊजरसाठी मायक्रोसॉफ्टने गुगल क्रोममध्ये वापरलेल्या क्रोमियम या ब्राऊजर इंजिनचा वापर करण्यास सुरुवात केल्याचं जाहीर केलं होते.

गुगल क्रोमप्रमाणेच नव्या एज ब्राऊजरमध्ये सर्व एक्‍स्टेंशन्स वापरणं शक्‍य होणार असल्याचं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे. त्याशिवाय आणखी काही खास सुविधाही या ब्राऊजरमध्ये जोडल्या आहेत.

क्रोमियम गुगलने डेव्हलप केलेलं ब्राऊजर इंजिन असून, ते गुगल क्रोम, ऑपेरा अशा जवळपास सर्व प्रमुख ब्राऊजरमध्ये समाविष्ट केलेलं आहे. 

क्रोमियम सध्या ओपन सोर्स उपलब्ध असून, त्यावर आधारित ब्राऊजर कोणीही मोफत तयार करू शकतं.
 
आत्तापर्यंत केवळ मायक्रोसॉफ्ट एज आणि फायरफॉक्‍स हे दोनच ब्राऊजर क्रोमियमचा वापर करत नव्हते. मात्र आता एजनेसुद्धा क्रोमियमची वाट धरली आहे. 

इंटरनेटचा वापर क्रोमियमकडे एककेंद्रित होण्याची तज्ज्ञांची भीती.

आमचा ब्राऊजर हा फायरफॉक्‍सवर आधारित असून, एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही आजही बाजारात पाय रोवून उभे आहोत. हा ब्राऊजर विंडोज १० च्या नव्या अपडेटमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, हा ब्राऊजर www.microsoft.com/en-us/edge या लिंकवरून डाउनलोड करता येईल. तो इन्स्टॉल केल्यावर जुन्या एज ब्राऊजरला स्वतःहून रिप्लेस करेल, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com