टेक्नोहंट : डेटा साठीयेला...

Data
Data

अर्थविश्‍वात एक संकल्पना रूढ होती, ती म्हणजे जगाचे अर्थकारण तेलाभोवती फिरते; परंतु आता अर्थकारण डेटाभोवती फिरेल, अशी म्हणायची वेळ आहे. कारण प्रत्येक क्षणाला तयार आणि शेअर होणाऱ्या डेटा निर्मितीचा वेग आणि प्रमाण सातत्याने वाढत आहे. माहितीचा हा खजिना साठवण्यासाठी आवश्‍यकता असते डेटा स्टोअरेज डिव्हाईसेसची. क्‍लाऊड स्टोरेजच्या माध्यमातून डेटा सहजपणे साठवता येऊ लागला. त्यानिमित्ताने डेटा स्टोरेजचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया...

१९२८ - मॅग्नेटिक टेप - जर्मनीच्या फ्रिट्‌स फ्ल्यूमर यांनी ध्वनिमुद्रणासाठी सर्वप्रथम मॅग्नेटिक टेपचा वापर केला. एका कागदाच्या पट्टीवर आयर्न ऑक्‍साईडचे लेपन करून त्याद्वारे ही मॅग्नेटिक टेप तयार करण्यात आली.

१९३२ - मॅग्नेटिक ड्रम - मॅग्नेटिक डेटा स्टोअरेज प्रणालीतील या मॅग्नेटिक ड्रमचा शोध ऑस्ट्रियाच्या गुस्तव तौशेक यांनी लावला. पुढे १९५०पर्यंत याचा मोठ्या प्रमाणात वापरही झाला. विशेष म्हणजे, १९६०मध्ये तत्कालीन संगणकासाठी याचा वापर झाला.

१९४६ - विल्यम्स ट्यूब - फॅड्रिक सी. विल्यम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बायनरी डेटा इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने साठवण्यासाठी कॅथोड रे ट्यूबचा सर्वप्रथम वापर केला. विल्यम यांच्या नावावरून विल्यम ट्यूब ओळखली जात होती. रॅण्डम अक्‍सेस असलेले हे पहिलेच डिजिटल स्टोअरेज डिव्हाईस होते.

१९४६ - सिलेक्‍ट्रॉन ट्यूब - संगणकाची मेमरी म्हणून १९४६मध्ये रेडिओ कॉर्पोरेशन ऑफ अमेरिकाने सिलेक्‍ट्रॉन ट्यूब विकसित केली होती.

१९५६ - हार्ड डिस्क - तत्कालीन वापरात असलेल्या मॅग्नेटिक स्ट्रीपवरील डेटा बिट्‌सच्या स्वरूपात साठवण्यासाठी हार्डडिस्कचा प्रथमच वापर करण्यात आला. सुरुवातीला कपाटाएवढ्या आकाराच्या हार्डडिस्कमध्ये पाच एमबी डेटा साठवता येत होता, आता हाताच्या तळव्याएवढ्या हार्ड डिस्कमध्ये चार ते पाच टीबीपर्यंतचा डेटा साठवता येतो.

१९६३ - म्युझिक टेप - फिलिप्स कंपनीने १९६३ साली सर्वप्रथम कॉम्पॅक्‍ट ऑडिओ कॅसेट सादर केले. ध्वनिमुद्रित केलेल्या संगीताच्या प्रती वितरित करण्यासाठी म्युझिक टेपचा वापर सुरू झाला.

१९६६ - डी-रॅम - रॉबर्ड एच. डेनार्ड यांनी डायनॅमिक रॅण्डम अँक्‍सेस मेमरी (डी-रॅम) हे तंत्रज्ञान विकसित केले. डी-रॅमवर देखील बिट्‌सच्या स्वरूपात माहिती साठवण्यासाठी इलेक्‍ट्रिक चार्ज सर्किटचा वापर करण्यात आला.

१९७० - बबल मेमरी - एक बिट क्षमतेचा डेटा साठवण्यासाठी एका पातळ मॅग्नेटिक फिल्मचा वापर करण्यात आला. त्यावरील मॅग्नेटाईज भाग हा बुडबड्यांसारखा दिसत असल्याने त्याला बबल मेमरी म्हणून ओळखले जात असे.

१९७६ - ५.२५ इंच फ्लॉपी - ११० किलोबाईट्‌स क्षमतेचा डेटा साठवण्यासाठी १९७६ साली ही ५.२५ इंच आकाराची फ्लॉपी विकसित करण्यात आली. आतापर्यंत आलेल्या स्टोअरेज डिव्हाईसेसपैकी सर्वांत स्वस्त आणि वेगवान होती.

१९८० - सीडी - जेम्स टी. रसेल यांनी १९८० साली सर्वप्रथम कॉम्पॅक्‍ट डिस्क विकसित केली आणि ती सोनी कंपनीने बाजारात आणली होती.

१९९२ - मिनी-डिस्क - कोणत्याही प्रकारचा डेटा साठवण्यासाठी सर्वप्रथम मिनी डिस्कचा वापर करण्यात आला. मात्र, मिनी डिस्कचा सर्वाधिक वापर ऑडिओ स्वरूपातील डेटा साठवण्यासाठीच झाला.

१९९४-९७ - कॉम्पॅक्‍ट फ्लॅश - सर्वसाधारणपणे सीडीच्या स्वरूपातील विविध स्टोरेड डिव्हाईसेस नव्वदच्या दशकात विकसित झाले. त्यामध्ये डिव्हीडी, स्मार्ट मीडिया आणि मल्टिमीडिया कार्डसारखे पर्याय उपलब्ध झाले.

१९९९ - मायक्रोड्राईव्ह - पेनड्राईव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यूएसबी फ्लॅश ड्राईव्हचा वापर २१व्या शतकाच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाला. सुरवातीला काही एमबी साठवण क्षमता असलेले पेनड्राईव्ह पुढे काही जीबीपर्यंत उपलब्ध झाले.

२००३-०५ - एसडी कार्ड - पेनड्राईव्हपर्यंत आकाराने लहान झालेले स्टोअरेज डिव्हाईसेस पुढे एसडी कार्डच्या माध्यमातून काही मिलिमीटर आकाराच्या एसडी कार्ड अर्थात मेमरी कार्डच्या स्वरूपात उपलब्ध झाले. एक ते दोन जीबीपर्यंत मिळणारे एसडीकार्ड आता एक टीबीचेही मिळतात.

२०२० - क्‍लाऊड स्टोअरेज बॅकअप - डेटा निर्मितीची अव्याहतपणे सुरू असलेली प्रक्रिया आणि साठवणूकीच्या मर्यादा लक्षात घेता हल्ली क्‍लाऊड स्टोअरेज बॅकअपचा वापर वाढला आहे. डेटा सुरक्षित राहावा म्हणून त्याचा बॅकअप ठेवण्याकडेही कल वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर क्‍लाऊड स्टोअरेजचा अधिक प्रभावीपणे विस्तार होत आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com