टेक्नोहंट : नवी ‘त्रिसूत्री’

ऋषिराज तायडे
Thursday, 1 April 2021

गेला आठवडा भारतीय मोबाईल बाजारविश्वासाठी धमाकेदार राहिला. एकापाठोपाठ एक सलग तीन दिवस तीन मातब्बर कंपन्यांनी त्यांचे दमदार मोबाईल बाजारात दाखल केले.

गेला आठवडा भारतीय मोबाईल बाजारविश्वासाठी धमाकेदार राहिला. एकापाठोपाठ एक सलग तीन दिवस तीन मातब्बर कंपन्यांनी त्यांचे दमदार मोबाईल बाजारात दाखल केले. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातून ज्या मोबाईलची ग्राहक आतुरतेने वाट पाहात होते, त्या वनप्लसची ‘९ सीरिज’ सादर झाली. त्यापाठोपाठ रिअलीमीची ‘८ सीरिज’ आणि विवोची ‘एक्स सीरिज’ ही ग्राहकांच्या भेटीला आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वनप्लस ‘९ सीरिज’
वनप्लसने नुकतीच त्यांची ९ सीरिज लॉंच केली. आयफोनशी स्पर्धा करणाऱ्या वनप्लसने ९ सीरिजमध्ये तीन मोबाईल सादर केले. नासाच्या अंतराळ मोहिमांमध्ये छायाचित्रणासाठी जे कॅमेरे वापरले जातात, त्या हॅसलब्लेड कंपनीशी वनप्लसने भागीदारी केली असून दर्जेदार कॅमेरा या वेळी देण्यात आला आहे.

No photo description available.

रिअलमी ‘८ सीरिज’
गेल्या पंधरवड्यात सादर झालेल्या रेडमीच्या नोट १० सीरिजशी स्पर्धा करण्यासाठी रिअलमीने रिअलमी ८ सीरिज लॉन्च केली. रेडमीने ५G न दिल्याने ग्राहकांची ‘रिअली’कडून तशी अपेक्षा होती, मात्र त्याबाबत रिअलमीनेही भ्रमनिरास केला. केवळ १०८ मेगापिक्सल कॅमेरा हे वेगळेपण सोडल्यास रिअलमीने यावेळेस फारसे वेगळे काही दिले नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विवो ‘एक्स सीरिज’
खास मोबाईल फोटोग्राफीची आवड असणाऱ्या ग्राहकांची आवड लक्षात घेता विवोने नुकतीच ‘एक्स’ सीरिज भारतात लॉंच केली.  दर्जेदार कॅमेरा लेन्सची निर्मिती करणाऱ्या ‘झायस’ कंपनीसोबत विवोने भागीदारी केली आहे.  त्यामुळे ‘एक्स’ सीरिजमध्ये फोटोग्राफीचे वेगवेगळे फीचर्स उदा. अल्ट्रा वाईड नाईट मोड, टाईम लॅप्स, स्लो-मो आदी देण्यात आले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushiraj Tayade Writes about New Mobiles