घरबसल्या योगासने शिकण्यासाठी मोबाईल अॅप्स तुम्हाला मदत करणार वाचा सविस्तर...

ऋषिराज तायडे 
बुधवार, 24 जून 2020

योगासने हा निरोगी आरोग्याचा मंत्र आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेर जाऊन योगासनाचे प्रशिक्षण घेता येत नाही.त्यामुळे घरबसल्या योगा शिकण्यासाठी मोबाईल अॅप्स तुम्हाला मदत करणार आहे.त्यांबद्दल थोडक्यात

जागतिक योग दिन नुकताच साजरा झाला, मात्र यंदाच्या वर्षी योग दिनावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करता आला नाही. सध्याच्या धकाधकीच्या आणि कोरोनासारख्या संकटाच्या काळात निरोगी आरोग्याची गरज आहे. योगासने हा निरोगी आरोग्याचा मंत्र आहे, हे आपण जाणतोच.

हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या साह्याने जपा आरोग्य!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेर जाऊन योगासनाचे प्रशिक्षण घेता येत नाही. त्यामुळे घरबसल्या योगा शिकण्यासाठी मोबाईल अॅप्स तुम्हाला मदत करणार आहे. त्यांबद्दल थोडक्यात... 

१. योगी फाय (YogiFi) ः 
Image may contain: text that says "yogify"

पर्सनलाईज योगासनाच्या प्रशिक्षणासाठी हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. नियमित सत्रांशिवाय लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असणारी योगांची सत्रेही इथे उपलब्ध आहेत. प्राथमिक पातळीवर वॉर्मअप्स, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारची आसनांची विविध सत्रे निश्‍चितच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे, अगदी प्राथमिक पातळीपासून योग शिकायचा असल्यास तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. याशिवाय तुमच्या नियमित योगांच्या सत्रांचे विश्लेषण शेवटी दिले जाते. 

२. पॉकेट योगा (Pocket Yoga) ः 
Image may contain: ocean, text and water

प्राथमिक व्यायाम, प्राणायाम आणि योगांच्या विविध सत्रांच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. एखादा आसनाचा प्रकार करताना शरीराची स्थिती कशी असावी, शरीराला ताण कसा द्यावा, नेमकी कुठे खबरदारी घ्यायची, त्याचे फायदे याविषयी इत्थंभूत माहिती या अॅपवर तुम्हाला मिळते. तुमच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या कालावधींची आणि पातळीनुसारची अनेक सत्रे इथे उपलब्ध आहे. 

३. काम (Calm) ः 
Image may contain: text that says "Calm"

निरोगी शरीरासोबत एकाग्रतेसाठी योगांबरोबर प्राणायाम हे खूप फायदेशीर आहे. प्राणायामाचे महत्त्व, त्याची सध्या असलेली गरज, प्राणायामाची विविध सत्रे उदा. एकाग्रतेसाठी, शांत झोपेसाठी, तणावमुक्तीसाठी, चिडचिडेपणा कमी करण्यासाठी वेगवेगळी सत्रे तुम्हाला निश्‍चित फायदेशीर ठरतील. त्याशिवाय मन प्रसन्न करणारी संगीताची खास मेजवानीही इथे तुम्हाला आकर्षित करते. 

४. डाऊन डॉग (Down Dog) ः 
Image may contain: text

तुमच्या आवडीप्रमाणे वेळ निश्चित करून दररोज योगाचे नवनवीन सत्र तुम्हाला या अॅपवर अनुभवता येतात. योगासनांचे विविध प्रकार तुम्हाला शिकवले जातात. विशेष म्हणजे, विविध भाषांत योगाचे मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे योगाचा एकच प्रकार तुम्हाला पुन्हा-पुन्हा शिकवत नाही. योगासनांशी साधर्म्य असणारे संगीतही येथे ऐकायला मिळते. टप्प्यानुसार विशिष्ट वेळांची सत्रे इथे अनुभवायला मिळतात. 

५. ब्रिद (Breathe) ः 
Image may contain: phone

अॅपल वॉच वापरणाऱ्यांना ब्रिद अॅपविषयी नक्कीच माहिती असेल. श्‍वसनासंबंधीचे प्राणायाम आणि ते दिवसातून कधी करायचे, याबाबत ते तुम्हाला आठवणही करून देते. हे अॅप तुमच्या प्राणायामावर आणि श्‍वसनावर बारकाईने लक्ष देत तुम्ही एका सत्रात किती श्वासोच्छ्वास केला, याबाबतची माहितीही तुम्हाला देते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rushiraj tayade writes article about Online yoga Take care of your health