बोलबाला देशी अॅप्सचा....

ऋषिराज तायडे
बुधवार, 29 जुलै 2020

चिनी अॅप्सवरील बंदीचे भारतीयांनी स्वागत केले. मात्र, दुसरीकडे चिनी अॅप्सला पर्याय म्हणून अस्सल भारतीय अॅप्स दाखल झाले आहेत आणि त्याला भारतीयांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.जाणून घेऊया या देशी अॅप्सबद्दल

भारत-चीनवरील वाढता तणाव आणि चीनच्या खुरापती लक्षात घेता केंद्र सरकारने गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरील एकूण ५९ अॅप्सवर बंदी घातली. चिनी अॅप्सवरील बंदीचे भारतीयांनी स्वागत केले. मात्र, दुसरीकडे चिनी अॅप्सला पर्याय म्हणून अस्सल भारतीय अॅप्स दाखल झाले आहेत आणि त्याला भारतीयांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया या देशी अॅप्सबद्दल...

हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या साह्याने जपा आरोग्य!

 ट्रेल 
टिकटॉकवर बंदी घातल्यावर भारतीयांच्या प्रतिभेसाठी ट्रेल हे अॅप दाखल झाले आहे. त्यावर लहान व्हिडिओ तयार करून अपलोड करता येते. टिकटॉकवर बंदीनंतर आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत ट्रेल अॅपने सर्व विक्रम मोडीत काढत फक्त पाच दिवसांत १ कोटी २० लाख डॉऊनलोड्स झाले. भारतीय कंटेंट क्रिएटर्सनेही अॅपला चांगला प्रतिसाद देत या प्लॅटफॉर्मवर एका दिवसांत ५ लाखांहून अधिक व्हिडिओ अपलोड झालेत.

खबरी

Image may contain: text that says "O Khabri"
हे एक ऑडिओ पॉडकास्ट अप्लिकेशन असून, इन्फ्लुएन्सर्सना विविध विषयावरील पॉडकास्ट सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या या अॅपला चिनी अॅपवरील बंदीनंतर प्रतिसाद वाढत आहे. यू-ट्यूबप्रमाणे याठिकाणी तुमचे चॅनेल तयार करून त्यावर तुम्ही तुमचा ऑडिओ कंटेट प्रसिद्ध करू शकता. तुमचे चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला मासिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.

रुटर

Image may contain: text that says "rooter INDIA'S BIGGEST FAN COMMUNITY"
स्पोर्ट्स आणि गेमिंगमध्ये भारतातील एकमेव आणि सर्वांत मोठा यूझर निर्मित कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. रूटरची लाइव्ह कंटेंट टेक्नोलॉजीतील अद्वितीय उत्पादन स्थिती स्पोर्ट्स कॉमेंट्री, लाइव्ह क्विझ, मोबाइल गेम स्ट्रीमिंग इत्यादी साधने उपलब्ध करून देते. रुटरवर वैयक्तिक व्हिडिओज, इमेजेस, पोल्स इत्यादी वैयक्तिक स्पोर्ट्स फीड टाकता येतात.

शेअरचॅट
No photo description available.

सोशल मीडिया स्टार्टअप शेअरचॅट हा १५ भारतीय भाषांमध्ये दररोज व्हॉट्सअप मेसेज, स्टेट्स शेअर करण्यासाठीचा भारतीय पर्याय आहे. शेअरिंग प्लॅटफॉर्मच्या रूपात सुरू झालेल्या या अॅपवर पोस्टर्स, इमेजेस, ऑडिओ, जीआयएफ आणि हॅशटॅग शेअर करण्यासाठी यूजर्सना चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rushiraj Tayde article about Indian apps