महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांची नियुक्ती.

श्री. सागर उल्हास ढोले पाटील
श्री. सागर उल्हास ढोले पाटील Dhole Patil college

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री.सागर उल्हास ढोले पाटील यांची 125 वर्षाचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कार्य त्यांनी केले. अत्यंत कमी कालावधी मध्ये संस्थेने खुप प्रगती केली त्यांच्या मार्गदर्शनखाली नॅक मध्ये "अ प्लस" मूल्यांकन प्राप्त केले आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था निर्मिती साठी सदैव प्रयत्नशील असणारे श्री. सागर ढोले पाटील यांच्या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. महर्षी कर्वे म्हणजेच अण्णासाहेब यांनी प्रचंड अथक परिश्रमातून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांच्या विचारांना अभिप्रेत असणारे कार्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या ऐतिहासिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी माजी निवड होणे हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे जबाबदारी ही वाढलेली असून पुढील काळामध्ये विद्यार्थी केंद्रित काम व महर्षी कर्वे यांना अभिप्रेत काम करणे हेच माझे नैतिक कर्तव्य असेल असे मत सागर ढोले पाटील सर यांनी व्यक्त केले." महर्षी कर्वे शिक्षण स्त्री संस्थेने काम करण्याची जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com