YIN: 'धोरणात्मक प्रक्रियेत महिलांना सामील करून घेतले पाहिजे'

यिन वेबीनार: महिला सामाजिक कार्यकर्त्यांचे केंद्रिय सदस्यांना मार्गदर्शन
Pranay Manjari
Pranay Manjari YIN Sakal

Pranay Manjari YIN Webinar

आजही देशाचे धोरण बनवताना ३७ % लोकांना ग्राह्य धरले जात नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे बनवले जातात. विकासासाठी धोरणे तयार केली जातात पण ज्यांच्यासाठी ही धोरणे तयार केली जातात त्यांनाच ग्राह्य धरल्या जात नाही धोरणात्मक प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील सामील करून घेतले पाहिजे असे मत ओडिसा येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रणय मंजरी यांनी व्यक्त केले.

प्रणय मंजरी या ओडिसा येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या आहेत.त्या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. आज एका मोठ्या कंपनीच्या सी एस आर प्रमुख आहे. या पदाचा उपयोग त्या समाजातील स्थलांतरित लोकांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी काम करत आहे.

'निर्णय प्रक्रियेत महिला दिसतील तेव्हाच; समाजात बदल घडेल'

ज्या सभागृहातून देशाचे धोरण ठरविले जाते त्याच सभागृहात महिलांची संख्या नगण्य आहे. ही संख्या वाढविण्यासाठी आणि समान हक्कासाठी राजकीय पक्षांवर दबाव टाकायला हवा.

महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे. शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. महिलांचे वेगवेगळे प्रश्न समजावून घेतले पाहिजे. देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिला नसेल तर समाजात अपेक्षित बदल घडणार नाही असे मत दिल्ली येथील एएनएचडी च्या संस्थापक विश्वस्त शबनम हाश्मी यांनी व्यक्त केले.

२४ मार्च रोजी झालेला वेबिनार
२४ मार्च रोजी झालेला वेबिनार

यावेळी सकाळ माध्यम समूहाने ' यिन' केंद्रीय समितीच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या दहा दिवसीय ऑनलाईन रिसर्च वेबिनार सिरीजममध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्रणय मंजरी आणि शबनम हाश्मी बोलत होत्या.

पहिल्या सत्रात शीतल भोसले यांनी सकाळ माध्यम समूहाच्या यिन केंद्रीय समितीची माहिती दिली.पाहुण्यांचा परिचय पूजा खपाले यांनी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्त्री प्रतिष्ठा समितीच्या अध्यक्षा सायली वाडदेकर यांनी केले. रुपाली वनमाने यांनी आभार मानले.

दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाची प्रस्तावना स्त्री प्रतिष्ठा समिती संघटक कांचन साळुंखे यांनी केली, पाहुण्यांचा परिचय कार्याध्यक्ष ऋतुजा पाटील यांनी केला.सुत्रसंचालन समिती संघटक उषा बामणे यांनी केले. नताशा बोरकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com