संजू सॅमसनला आवडतो 'हा' पदार्थ; रेसिपी घ्या जाणून

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने भारताला टी२० वर्ल्ड कप २०२६ जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

मालिकावीर

त्याने ५ सामन्यात तीन अर्धशतकांसह ३२१ धावा केल्या आणि मालिकावीर पुरस्कारही जिंकला.

Sanju Samson

|

Sakal

संजू सॅमसनचा आवडता पदार्थ

संजू सॅमसन हा फुडी देखील असून त्याला प्रसिद्ध मल्याळी पदार्थ फिश करी आणि कप्पा खूप आवडतो.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

पौष्टिक

फिश करी आणि कप्पा हा पौष्टिकही असल्याचे त्याने मुलाखतींमध्ये सांगितले आहे. या पदार्थाची रेसिपीही जाणून घ्या.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

फिश करी साहित्य :

५०० ग्रॅम मासे, २ चमचा नारळ तेल, मोहरी, कढीपत्ता, ५-६ लसूण पाकळ्या, १ छोटा कांदा, आल्याचा तुकडा, २ चमचा काश्मिरी तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा धणे पावडर, १ छोटा चिंचेचा गोळा, चवीनुसार मीठ आणि २ कप पाणी

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

कप्पासाठी साहित्य

टॅपिओका, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, २ चमचा किसलेले नारळ, २ लसूण पाकळ्या, १ हिरवी मिरची, १ चमचा नारळ तेल, कढीपत्ता

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

कप्प्याची कृती

आधी टॅपिओका सोलून त्याचे छोटे तुकडे करा आणि ते पाण्यात हळद आणि मीठ घालून मऊ होईपर्यंत शिजवा. मऊ झाल्यानंतर पाणी काढून टाका व टॅपिओका हलके मॅश करा.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

कप्पा तयार!

नंतर नारळ, लसूण, आणि हिरवी मिरची यांची पेस्ट करून मॅश केलेल्या टॅपिओकामध्ये मिसळा. नारळाचे तेल गरम केल्यानंतर कढीपत्ता घाला आणि ते कप्प्यात मिसळा. कप्पा तयार आहे.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

फिश करीची कृती

फिश करीसाठी भांड्यात नारळाचे तेल तापण्यास ठेवा, त्यात मोहरी, कढीपत्ता घातल्यानंतर लसून-आलं आणि कांदा घालून परतून घ्या.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

कांदा परतल्यानंतर...

त्यानंतर मिरची पावडर, हळद, धणे पावडर आणि थोडे पाणी लसून - कांदा परतलेल्या भांड्यात टाका. त्यात चिंचेचे पाणी आणि मीठ घालून उकळी येऊ द्या.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

मासे शिजवा अन् डिश तयार

यानंतर या मिश्रणात माशाचे धुवून स्वच्छ केले तुकडे घाला आणि ते शिजू द्या. शिजल्यानंतर ही करी कप्प्यासोबत सर्व्ह करा.

Sanju Samson’s Favorite Dish Fish Curry & Kappa

|

Sakal

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले टॉप-५ क्रिकेटर्स

MS Dhoni - Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा