अपघातानंतरही रंजना माझ्याशी अशोक मामांबद्दल बोलायची

Payal Naik

रंजना देशमुख

अनेक भूमिका आपल्या अभिनयाने जिवंत करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. त्यांचं नाव आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असतं.

RANJANA | ESAKAL

खणखणीत वाजणारं नाणं

त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. मात्र एका अपघाताने त्यांचं आयुष्य बदललं. पडद्यावर खणखणीत वाजणारं हे नाणं कायमचं व्हीलचेअरला खिळलं.

RANJANA | ESAKAL

अनिता पाध्ये

त्यांच्या शेवटच्या दिवसात पत्रकार अनिता पाध्ये त्यांच्यासोबत संपर्कात होत्या. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अनिता यांनी रंजना यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.

RANJANA | ESAKAL

चार ऑपरेशन

अनिता म्हणाल्या, 'सिनेमाच्या शूटिंगला जात असताना रंजू ताईचा अपघात झाला. तिची चार ऑपरेशन झाली.'

RANJANA | ESAKAL

रंजू ताई

रंजू ताई ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भूमिकांमध्ये चपखलपणे बसायची. तिच्यासारखी व्हर्सटाईल अभिनेत्री होणे नाही. ती माझ्याशी अनेक वैयक्तिक गोष्टी बोलायची.

RANJANA | ESAKAL

क्लेशदायक

तिला असं बघणं क्लेशदायक होतं. तिच्या चेहऱ्याला काहीही झालं नव्हतं. तिचा चेहरा अगदी सुंदर जसाच्या तसा होता

RANJANA | ESAKAL

पॅरेलाईज

मात्र तिचं शरीर पॅरेलाईज झालं होतं. तिचा एक हात गळाला होता. गळाला म्हणजे जेव्हा अपघात झाला तेव्हा तिचा हात दहा बारा फुटावर पडला होता. ती सरकत जाऊन तो घेऊन आली.

RANJANA | ESAKAL

डॅशिंग बाई

खूप डॅशिंग बाई होती ती. ती माझ्याशी अगदी अशोक मामांच्याबद्दलही बोलायची. त्यांच्याकडे कॉडलेस फोन होता. तो जर तिच्या हातात दिला तर तो हातातून कानाजवळ नेईपर्यंत पाच मिनिटं लागायची.

RANJANA | ESAKAL

व्हीलचेअरवर

ती जिद्दी होती. शेवटी ती एका नाटकातून परत आली. पण व्हीलचेअरवर बसून तिने ते नाटक केलं. इतक्या सुंदर अभिनेत्रीचं असं व्हावं हे क्लेशदायी व्हावं.

RANJANA | ESAKAL

करिअर बाद झालं

या इंडस्ट्रीमध्ये असं आहे की एकदा करिअर बाद झालं की त्याला भेटायला कुणी जात नाही.

RANJANA | ESAKAL

गोबरे गाल अन् तेच गोड हसू! तेजश्री प्रधान लहानपणी कशी दिसायची पाहिलंत का?

tejashree pradhan | esakal
येथे क्लिक करा