संतोष कानडे
मुघल सम्राटांनी मध्य आशियाई, पर्शियन आणि भारतीय मसाल्यांचे मिश्रण करून 'मुघलाई खाद्यसंस्कृती' विकसित केली होती.
मुघल दरबारात मांसाहारी पदार्थांना सर्वोच्च पसंती होती, ज्यामध्ये केसर आणि सुकामेवा घातलेली 'मुघलाई बिर्याणी' अत्यंत लोकप्रिय होती.
तांदळामध्ये सुगंधी अत्तर आणि मांसाचे अर्क वापरून बनवलेला 'यखनी पुलाव' हा त्यांचा आणखी एक आवडता भाताचा प्रकार होता.
मुघलांच्या ताटात तोंडात विरघळणारे 'गलावटी कबाब', 'शामी कबाब' आणि 'बोटी कबाब' यांसारख्या कबाबचे अनेक प्रकार असायचे.
सम्राट अकबराला मांस, गहू आणि डाळी मंद आचेवर शिजवून बनवलेला 'हलीम' हा पदार्थ प्रचंड आवडायचा.
अकबराला 'पंचमेळ डाळ' आणि 'खिचडी' हे शाकाहारी पदार्थही आवडत असल्याचा उल्लेख 'आईन-ए-अकबरी' ग्रंथात आढळतो.
मुघल काळात रात्रभर मंद आचेवर शिजवलेला मटणाचा रस्सा म्हणजेच 'नहारी' हा सकाळी गरम नानसोबत न्याहारी म्हणून खाल्ला जाई.
गोड पदार्थांमध्ये मुघल राजे तुपात तळलेला ब्रेड आणि रबडीपासून बनवलेला 'शाही तुकडा' आणि 'फिरनी' आवडीने खात असत.
उन्हाळ्यात थंडगार 'शाही कुल्फी' आणि सरबते बनवण्यासाठी मुघल सम्राट थेट हिमालयातून यमुनेच्या मार्गाने नौकेतून बर्फ मागवत असत.
मुघलांमध्ये जहांगीरला विलासी मांसाहारी जेवणाची आवड होती, तर औरंगजेब हा अतिशय साधा, बहुतांश वेळा शाकाहारी अन्न आणि 'खिचडी' पसंत करायचा.