मुघलांची व्यसनं आणि अजब प्रकारचे छंद...

संतोष कानडे

मुघल सम्राट

मुघल सम्राट जहांगीर हा मद्यपान आणि अफीमच्या व्यसनात इतका बुडाला होता की, त्याने राज्याचा कारभार आपली पत्नी नूरजहान हिच्या हाती सोपवला होता.

अकबर

सम्राट अकबर याला पाळीव प्राण्यांचा, विशेषतः चित्त्यांचा प्रचंड शौक होता; त्याच्याकडे शिकार करण्यासाठी तब्बल एक हजाराहून अधिक प्रशिक्षित चित्ते होते.

सुगंधी द्रव्य

'अत्तर' म्हणजेच सुगंधी द्रव्यांचा मुघल दरबारात मोठा छंद होता; जहांगीरची आई अस्मत बेगम हिने गुलाबापासून अत्तर बनवण्याचा शोध लावला होता.

शहाजहान

शहाजहानला हिरे, माणके आणि मौल्यवान रत्नांचा विलक्षण छंद होता. त्याने स्वतःसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जगप्रसिद्ध 'मयूर सिंहासन' बनवून घेतले होते.

शिकार

मुघल बादशहांना शिकारीची प्रचंड आवड होती. अनेकदा शेकडो सैनिकांना सोबत घेऊन जंगलात आठवडाभरही शिकारीच्या मोहिमा चालत असत.

हुमायून

दुसरा मुघल सम्राट हुमायून याला खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे अजब वेड होते. तो आठवड्याच्या सात दिवसांनुसार वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालत असे.

कबुतरबाजी

अकबराला कबुतरबाजीचा मोठा छंद होता, त्याच्याकडे जगभरातील विविध प्रजातींची २० हजारांपेक्षा जास्त कबुतरे होती आणि तो या खेळाला 'इश्कबाजी' म्हणायचा.

आलिशान स्मारके

बहुतांश मुघल सम्राटांना स्वतःची भव्य आणि आलिशान स्मारके किंवा बागा बांधण्याचा एक मोठा वास्तुकलेचा शौक होता.

मुघल राजा

औरंगजेब हा इतर मुघल राजांसारखा विलासी नव्हता. पण त्याला स्वतः टोप्या शिवण्याचा एक वेगळाच छंद होता.

मुघल जनानखान्याचे रहस्य; आत नक्की काय चालायचं?

<strong>येथे क्लिक करा</strong>