कुत्र्यांसाठी 'हे' पदार्थ आहेत विषासमान; पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी.

Aarti Badade

कुत्र्यांचा आहार आणि काळजी 

आपण कुत्र्याला कुटुंबातील सदस्य मानतो, पण माणसांचा आहार त्यांना नेहमीच मानवतो असे नाही. आपल्यासाठी पौष्टिक असणारे काही पदार्थ कुत्र्यांसाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकतात. पाहा कोणते पदार्थ टाळावेत.

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

चॉकलेट आणि कॅफेन (Chocolate & Caffeine) 

चॉकलेटमध्ये 'थिओब्रोमाईन' असते, जे कुत्र्यांच्या हृदयासाठी घातक आहे. तसेच चहा, कॉफी यातील कॅफेनमुळे त्यांना झटके येऊ शकतात किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

कांदा आणि लसूण (Onion & Garlic) 

आपल्या जेवणात चव वाढवणारा कांदा आणि लसूण कुत्र्यांसाठी अत्यंत विषारी असतो. यामुळे त्यांच्या शरीरातील तांबड्या पेशी कमी होऊन त्यांना 'अ‍ॅनिमिया' (रक्तक्षय) होऊ शकतो.

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

मनुके आणि द्राक्षे (Grapes & Raisins) 

मनुके किंवा द्राक्षे थोड्या प्रमाणात खाल्ली तरी कुत्र्यांची 'किडनी निकामी' (Kidney Failure) होण्याचा मोठा धोका असतो. त्यांना फळे देताना नेहमी काळजी घ्या.

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

कच्ची अंडी आणि अ‍ॅव्होकॅडो (Raw Eggs & Avocado) 

कच्च्या अंड्यांमुळे 'ई कोलाय' जीवाणूची विषबाधा होऊ शकते. तर अ‍ॅव्होकॅडोमधील 'पर्सिन' नावाच्या घटकामुळे कुत्र्यांना उलट्या किंवा डायरियाचा त्रास होतो.

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

खारट पदार्थ आणि कँडी (Salty Foods & Candy)

 जास्त मीठ असलेले पदार्थ कुत्र्यांच्या शरीरात सोडियमची विषबाधा करू शकतात. तसेच 'झॅलिटॉल' घटक असलेल्या कँडी किंवा च्युइंगममुळे त्यांची रक्तातील साखर कमी होऊन यकृताला इजा होऊ शकते.

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

बिया असलेली फळे (Seeds and Pits) 

सफरचंद, कलिंगड किंवा इतर फळे देताना त्यातील बिया आवर्जून काढून टाका. या बियांमुळे त्यांच्या पचनसंस्थेत अडथळा निर्माण होऊ शकतो. सुरक्षित रहा, आपल्या पाळीव मित्राला जपून खाऊ घाला!

10 Human Foods That Are Highly Toxic for Your Dog

|

sakal

हार्ट अटॅकचा सायलेंट धोका! कोलेस्ट्रॉल वाढण्यामागची ‘ही’ 5 मोठी कारणं वेळीच ओळखा

Bad cholesterol causes

|

Sakal

येथे क्लिक करा