Aarti Badade
कोलेस्ट्रॉल हा शरीरातील एक प्रकारचा मेद आहे. परंतु, शरीरात 'खराब कोलेस्ट्रॉल' वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
Bad cholesterol causes
Sakal
पॅकेज केलेले स्नॅक्स, जास्त तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वेगाने वाढू लागते.
Bad cholesterol causes
Sakal
व्यायामाचा कंटाळा आणि तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने शरीरातील 'चांगले कोलेस्ट्रॉल' (HDL) कमी होते. चालणे किंवा योगासने केल्याने कोलेस्ट्रॉल संतुलित राहते.
Bad cholesterol causes
Sakal
'बॉडी मास इंडेक्स' (BMI) ३० पेक्षा जास्त असेल, तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका सर्वाधिक असतो. तसेच, धूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयाच्या नसांचे नुकसान होऊन कोलेस्ट्रॉल वाढते.
Bad cholesterol causes
Sakal
लसूण हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम औषध मानले जाते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते.
Bad cholesterol causes
Sakal
ग्रीन टी केवळ वजनच कमी करत नाही, तर त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास मदत करतात. दिवसातून एक ते दोन कप ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते.
Bad cholesterol causes
Sakal
हळदीमध्ये 'कर्क्युमिन' असते, जे जळजळ कमी करते आणि उच्च कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
Bad cholesterol causes
sakal
निरोगी हृदयासाठी वजनावर नियंत्रण ठेवा, संतुलित आहार घ्या आणि दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. तुमची एक चांगली सवय तुमचे आयुष्य वाचवू शकते!
Bad cholesterol causes
sakal
Late night eating side effects
sakal