सकाळ डिजिटल टीम
तिरंगा ध्वज पहिल्यांदा २२ जुलै १९४७ रोजी स्वीकारण्यात आला होता.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावर तिंरगा झेंडा फडकावला होता.
जेव्हा व्यासपीठावर श्रोत्याचं तोंड प्रेक्षकांकडे असेल तर तिरंगा नेहमी डाव्या बाजूला असायला हवा.
सर्वसामान्य नागरिकांना आपले घर किंवा ऑफिसमध्ये ध्वजारोहण करण्याची परवानगी २२ डिसेंबर २००२ नंतर मिळाली.
२९ मे १९५३ मध्ये भारताचा तिरंगा सर्वात उंच पर्वत शिखर माऊंट एव्हरेस्टवर यूनियन जॅक आणि नेपाळच्या राष्ट्रीय ध्वजासोबत फडकवण्यात आला होता.
कोणत्याही परिस्थिती तिरंगा जमिनीला स्पर्श करायला नको. अन्यथा तो अपमान समजला जाईल.
भारताच्या बेंगळुरूपासून ४२० किमी दूर असणाऱ्या हुबळी येथे असणारी एकमेव कंपनी आहे जी झेंडा बनवणे आणि पुरवठा करण्याचे काम करते
तिरंग्यावर असणारे चक्र ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातील सम्राट अशोक यांच्या सारनाथ येथील स्तंभावरुन घेण्यात आलाय. चक्राचा अर्थ जीवनातील गती आणि स्थिरता म्हणजे मृत्यू असा आहे.
भारतात 'फ्लॅग कोड ऑफ इंडिया' नावाचा एक कायदा आहे. ज्यात तिरंगा फडकवण्यासंबंधात नियम दिले आहेत.
तिरंग्याचे उत्पादन नेहमी आयाताकृती मध्ये केले जाईल, ज्याचे प्रमाण 3:2 अशा प्रमाणात असेल. अशोक्र चक्रामध्ये २४ आरे असतील.