नागा साधूंबद्दलच्या 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Aarti Badade

कोण असतात नागा साधू?

नागा साधू हे सनातन धर्मातील संन्यास, कठोर तपश्चर्या आणि वैराग्याच्या परंपरेशी जोडलेले साधक आहेत.

naga sadhu | Sakal

दीक्षा प्रक्रिया असते कठीण!

नागा साधू होण्यासाठी अनेक वर्षे गुरुसेवा, ब्रह्मचर्य, साधना आणि कठोर शिस्तीचे पालन करावे लागते.

Naga Sadhu | sakal

स्वतःचं पिंडदान करण्याची परंपरा!

दीक्षेच्या वेळी काही परंपरांमध्ये साधक स्वतःचं पिंडदान करून जुन्या सांसारिक जीवनाचा त्याग केल्याचं प्रतीकात्मक दर्शन घडवतात.

naga sadhu | sakal

अंगावर लावतात पवित्र भस्म!

नागा साधूंच्या वेशभूषेत भस्माला विशेष महत्त्व असून अनेक साधू शरीरावर भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात.

Naga Sadhu

| esakal

आखाड्यांशी असतं खास नातं!

नागा साधू विविध आखाड्यांशी जोडलेले असतात आणि कुंभमेळ्यातील शाही स्नानासह धार्मिक विधींमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.

Naga Sadhu | Sakal

धर्मरक्षणासाठीही दिलं योगदान!

इतिहासात काही नागा संन्याशांनी शस्त्रधारी योद्ध्यांची भूमिका बजावत धार्मिक स्थळं आणि समाजाच्या संरक्षणासाठी लढा दिल्याचे उल्लेख आढळतात.

Naga Sadhu

| esakal

साधं जीवन आणि कठोर साधना!

भिक्षेवर उदरनिर्वाह, मर्यादित गरजा आणि हिमालय, गुहा किंवा एकांतातील साधना ही अनेक नागा साधूंच्या जीवनशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात.

Naga Sadhu

| esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांना काय म्हणत?

Shivaji Maharaj Mavle name

|

Sakal

येथे क्लिक करा