सकाळ वृत्तसेवा
आपल्या आयुष्यात चांगल्या-वाईट क्षणांबद्दल कोणासोबत बोलावे आणि कोणासोबत नाही, हे ठरवताना आपण अनेकदा संभ्रमात पडतो. मात्र, काही गोष्टी अशा असतात ज्या नेहमीच खाजगी ठेवायला हव्यात. चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत.
तुमच्या आर्थिक गोष्टी जसे की गुंतवणूक (SIP, म्युच्युअल फंड), उत्पन्न, कर यांसारख्या गोष्टी खाजगी ठेवाव्यात. या बाबतीत जितके कमी बोलाल तितके तुमच्यासाठी सुरक्षित राहील.
परिवारातील समस्या फक्त कुटुंबातील सदस्यांपुरत्याच मर्यादित ठेवा. जर तुम्हाला मदतीची गरज वाटत असेल, तर सल्लागार (Counselor) किंवा जवळच्या व्यक्तीशी बोला. कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या लोकांमध्ये याची चर्चा होऊ देऊ नका.
तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधातील समस्या तुमच्या पार्टनरशीच शेअर करा. इतरांकडून मिळणाऱ्या विविध सल्ल्यांमुळे संभ्रम वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न कोणासोबत शेअर करायचे याबाबत सावधगिरी बाळगा.
तुमच्या स्वप्नांबद्दल किंवा करिअरचा प्लॅन जास्त लोकांना सांगू नका. असे मानले जाते की इतरांची नकारात्मक ऊर्जा किंवा मत्सर तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतो.
जर तुम्ही कोणाला मदत केली असेल, जसे की आर्थिक मदत, दान किंवा कोणाला चांगला सल्ला दिला असेल, तर त्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही. खरी मदत तीच असते जी शांततेत केली जाते.
जे झाले ते झाले. तुम्ही केलेल्या चुका आणि त्यासाठी होणारा पश्चात्ताप याबाबत इतरांशी बोलून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे स्वतःला माफ करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येकाला आपले स्वतःचे विचार आणि मूल्ये असतात, पण प्रत्येकजण तो विचार स्वीकार करेल असे नाही. त्यामुळे अनोळखी ठिकाणी किंवा अनोळखी लोकांमध्ये आपल्या ठाम मतांबद्दल जपून बोला.
तुमच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती फक्त डॉक्टर किंवा कुटुंबीयांनाच असावी. लहान-मोठे आजार असो वा शस्त्रक्रिया, प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगण्याची गरज नाही.
OTP, PIN, किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती जसे की पासवर्ड शेअर करणे धोकादायक ठरू शकते. मजेत किंवा गंमतीनेही कुणासोबतही अशी माहिती शेअर करू नका. यामुळे फसवणूक किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
जर तुम्हाला कोणतीही अफवा किंवा गॉसिप माहिती असेल, तर ते इतरांना सांगण्यापेक्षा शांत राहणेच योग्य. कारण जर त्या अफवेचा सोर्स तुम्ही असाल, तर अडचणीत सापडण्याची शक्यता जास्त असते.