Yashwant Kshirsagar
मेथी मध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पाॅटेशिअम झिंक, व्हिटॅमिन-मिनरल इत्यांदीसह अनेक खनिजे असतात, जी आरोग्याला लाभदायी असतात. चला तर मग दररोज एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून खाण्याने काय होईल हे जाणून जाणून घेऊया.
मेथी दाणे ब्लड शुगर नियंत्रित करण्यात खूप फायदेशीर आहेत. डायबेटीज रुग्णांसाठी रामबाणापेक्षा कमी नाही. रोज पाण्यात भिजवून मेथी दाणे खाऊ शकतात.
मेथीमध्ये फायबर असते, जो पचनासाठी लाभदायक असते. मेथी दाणे रोज खाल्ल्याने पचनाच्या समस्या जसे की, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता पासून सुटका होते.
मेथी दाणे रोज भिजवून खाल्ल्याने वजन देखील नियंत्रित राहते. वजन कमी करायचे असेल तर दररोज सेवन केले पाहिजे.
मेथी मधील पोषक घटकांमुळे त्वचा तरुण राहते आणि केस काळे आणि दाट होतात.
कॉलेस्ट्रॉल कमी होते. तसेच हृदयसाठी देखील लाभदायक आहे. हदय चांगले ठेवायचे असेल तर दररोज भेजीदाणे भिजवून खायला हवे.
दररोज मेथी दाणे भिजवून खाल्ल्याने प्रजनन क्षमतेत वाढ होते. आणि प्रजननाशी संबंधित समस्याही कमी होतात.
मेथी दाणे महिलांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहेत. मासिक पाळी, मेनोपॉज, प्रेगन्सी, ब्रेस्ट फिडिंग, इत्यादी फायदेशीर आहे.