Anushka Tapshalkar
महिलांमध्ये चेहऱ्यावरील अनावश्यक केस ही सामान्य समस्या आहे. पार्लरच्या उपचारांऐवजी अनेक जणी नैसर्गिक घरगुती उपायांना प्राधान्य देतात.
facial hair
गव्हाचे पीठ, हळद आणि तूप एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. त्वचेवर हलक्या हाताने चोळल्यास बारीक केस आणि मृत त्वचा निघण्यास मदत होते.
Wheat flour, turmeric and ghee
2 चमचे बेसन, 2 चमचे गुलाबपाणी आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. वाळल्यानंतर हलक्या हाताने काढल्यास केसांची वाढ कमी होण्यास मदत मिळू शकते.
besan and gulab jal
sakal
1 चमचा मध, 2 चमचे साखर आणि थोडे पाणी गरम करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण त्वचेवर लावून वाळल्यावर काढल्यास एक्सफोलिएशनसह अनावश्यक केस दूर होण्यास मदत होते.
Sugar And Honey
बटाट्याचा रस, मूग डाळीचे पीठ, मध आणि लिंबाचा रस यांची पेस्ट तयार करा. वाळल्यानंतर हलक्या हाताने घासून काढल्यास त्वचा उजळ दिसू शकते.
पिकलेल्या पपईच्या गरात अर्धा चमचा हळद मिसळा. चेहऱ्यावर लावून काही मिनिटे मसाज केल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होऊ शकते.
Papaya and turmeric
esakal
हे उपाय काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात, मात्र त्यांचे परिणाम व्यक्तिनिहाय बदलू शकतात. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करा आणि त्वचेची जळजळ झाल्यास वापर थांबवा.
Precautions
sakal